Team India : आगरकरआधी हर्षा भोगलेंनीच जाहीर केली T20 वर्ल्ड कपची टीम, Live शोमध्ये दिली 15 खेळाडूंची लिस्ट!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपसाठी ज्येष्ठ कॉमेंटेटर हर्षा भोगले यांनी भारताची संभाव्य 15 सदस्यीय टीम सांगितली आहे.
मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली पाचवी टी-20 मॅच पावसामुळे रद्द झाली, पण भारताने ही सीरिज 2-1 ने जिंकली आहे. भारतात होणारा टी-20 वर्ल्ड कप 7 फेब्रुवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे, त्यामुळे टी-20 वर्ल्ड कपला आता फक्त 91 दिवस शिल्लक आहेत. टी-20 वर्ल्ड कपआधी टीम इंडिया फक्त 10 सामने खेळणार आहे, यातले 5 सामने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तर 5 सामने न्यूझीलंडविरुद्ध होणार आहेत. या 10 सामन्यांनंतर टी-20 वर्ल्ड कपमध्ये नेमकी कुणाची निवड होणार? हे निश्चित होईल.
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांच्या नेतृत्वातली निवड समिती टी-20 वर्ल्ड कपसाठी भारताच्या 15 खेळाडूंची नावं जाहीर करणार आहे, पण त्याआधी ज्येष्ठ कॉमेंटेटर हर्षा भोगले यांनी वर्ल्ड कपसाठी भारताची संभाव्य 15 सदस्यीय टीम सांगितली आहे. क्रिकबझच्या कार्यक्रमात बोलताना हर्षा भोगले यांनी वर्ल्ड कपमध्ये कोणत्या 15 खेळाडूंची निवड होऊ शकते, याची लिस्ट सांगितली आहे.
advertisement
हर्षा भोगलेंनी जाहीर केलेल्या टीममध्ये हर्षीत राणा आणि नितीश कुमार रेड्डी यांची निवड करण्यात आलेली नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये हे दोन्ही खेळाडू वनडे आणि टी-20 सीरिजचा भाग होते. तसंच यशस्वी जयस्वाल यालाही या टीममध्ये संधी मिळालेली नाही. हर्षा भोगलेंनी जाहीर केलेल्या टीममध्ये ऑलराऊंडर खेळाडूंचा भरणा आहे, तर फक्त 2 फास्ट बॉलरनाच टीममध्ये संधी देण्यात आली आहे.
advertisement
पाच ऑलराऊंडरना संधी
हर्षा भोगलेंनी जाहीर केलेल्या त्यांच्या टीममध्ये तब्बल 5 ऑलराऊंडर आहेत, ज्यात अभिषेक शर्मा, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश आहे. तर स्पिन बॉलिंगची जबाबदारी कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांच्याकडे असेल. आशिया कपमध्ये टीम इंडिया जास्त स्पिन बॉलर घेऊन मैदानात उतरली होती, ज्याचा फायदा त्यांना झाला. भारतातल्या खेळपट्ट्याही स्पिन बॉलिंगला अनुकूल असल्यामुळे वर्ल्ड कपमध्येही भारतीय टीम जास्त स्पिनर घेऊन मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
advertisement
हर्षा भोगलेंची टीम
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा, संजू सॅमसन, जितेश शर्मा, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 08, 2025 6:36 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : आगरकरआधी हर्षा भोगलेंनीच जाहीर केली T20 वर्ल्ड कपची टीम, Live शोमध्ये दिली 15 खेळाडूंची लिस्ट!


