थिएटरमध्ये रिलीज झाल्यात 5 नव्या Films! पार्टनरचा हात धरूनच बसा, आहेत अंगावर शहारे आणणाऱ्या स्टोरी

Last Updated:
New Films In Theatre : यंदाच्या शुक्रवारी एक-दोन नव्हे तर पाच नवे चित्रपट रिलीज झाले आहेत. वेगवेगळ्या जॉनरचे हे चित्रपट पाहून तुम्ही तुमचा वीकेंड खास करु शकता.
1/7
 घरबसल्या ओटीटीवर चित्रपट आणि वेबसीरिज पाहून कंटाळा आला असेल तर थिएटरमध्ये प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळू शकते.

advertisement
2/7
 7 नोव्हेंबर 2025 च्या शुक्रवारी वेगवेगळ्या जॉनरचे एका पेक्षा एक चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाले आहेत. वीकेंडला थिएटरमध्ये जाऊन प्रेक्षकांना या चित्रपटाचा आनंद नक्कीच घेता येईल.

3/7
 हक : इमरान हाशमी आणि यामी गौतम यांचा एका सत्य घटनेवर आधारित असलेला 'हक' हा कोर्टरूम ड्रामा आहे. शाह बानो प्रकरणावर आधारित हा चित्रपट आहे. सुपर्ण एस वर्मा यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटात इमरान हाशमी एका वकीलाच्या भूमिकेत आहेत. तर यामी गौतम शाह बानो यांच्या भूमिकेला न्याय देत आहे. अंगावर शहारे आणणारा चित्रपट तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत नक्की पाहू शकता.

4/7
 जटाधारा : जटाधारा हा सोनाक्षी सिन्हाचा पहिला तेलुगु चित्रपट आहे. हा एक सुपरनॅचरल थ्रिलर चित्रपट असून यात सस्पेन्स आणि पौराणिक कथांचं मिश्रण आहे. सोनाक्षीची भूमिका, दमदार सीन्स आणि चित्रपटाची चढ-उतार अशा सर्व गोष्टींमुळे हा चित्रपट प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो. तुम्हाला मायथोलॉजिकल ट्विस्ट पाहण्याची आवड असेल तर तुम्ही हा चित्रपट नक्की पाहा.

5/7
 अरोमाले : किशन दास आणि शिवात्मिका राजशेखर यांनी अरोमाले या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. हा एक रोमँटिक चित्रपट आहे. सुंदर लोकेशन्सवर चित्रित केलेला हा चित्रपट नवी आशा आणि नव्या नात्याच्या शोधाची कहाणी दाखवतो. रोमँटिक चित्रपटांचे चाहते या वीकेंडला आपल्या खास व्यक्तीसोबत थिएटरमध्ये हा चित्रपट एन्जॉय करू शकतात.

6/7
 प्रिडेटर : बॅडलँड्स : प्रिडेटर: बॅडलँड्स या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्गज प्रिडेटर फ्रँचायझीने कमबॅक केलं आहे. हा एक स्वतंत्र सायन्स-फिक्शन ॲक्शन चित्रपट आहे. जर तुम्ही एली फॅनिंगचे चाहते असाल आणि या विकेंडला एक चांगला ॲक्शन चित्रपट पाहायचा विचार करत असाल तर प्रिडेटर: बॅडलँड्स तुमच्यासाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे.

7/7
 डाय, माय लव : एरियाना हार्विक्झ यांच्या सर्वात लोकप्रिय कादंबरीवर आधारित डाय, माय लव्ह हा एक जबरदस्त सायकोलॉजिकल ड्रामा आहे. या चित्रपटात प्रेम, वेदना आणि स्व-ओळखीच्या गुंतागुंतीला दर्शवण्यात आले आहे. या चित्रपटात जेनिफर लॉरेन्स आणि रॉबर्ट पॅटिन्सन मुख्य भूमिकांमध्ये आहेत.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement