ती खरंच 'भाग्यलक्ष्मी' होती, पैसा आला, घर झालं! शेतकऱ्याने गायीला वाजत गाजत दिला अखेरचा निरोप, VIDEO
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
गाईच्या उपकारातून उतराई होण्यासाठी जालन्यातील एका शेतकरी दाम्पत्याने गाईच्या अंत्यविधीला वाजंत्री बोलावले.
जालना : गायीच्या उपकारातून उतराई होण्यासाठी जालन्यातील एका शेतकरी दाम्पत्याने गायीच्या अंत्यविधीला वाजंत्री बोलावले. एवढेच नव्हे तर सौभाग्य स्त्रीच्या अंत्यविधीलाही लाजवेल असा अंत्यविधी जालन्यातील धावेडी इथे पार पडला. पाहुयात या अनोख्या सोहळ्याविषयी…
नवविवाहित तरुणीला आंदण म्हणून गाय देण्याची परंपरा आपल्याकडे आहे. याच आंदण म्हणून आलेल्या भाग्यलक्ष्मीने जालन्यातील साबळे कुटुंबाचे नशीब पालटले. एका गाईच्या दूध आणि गोऱ्हे विक्रीतून आज त्यांच्याकडे 17 म्हशी आहेत. घरी संपन्नताही याच बहुळी गाईने आणली. याचीच कृतज्ञता म्हणून जेव्हा शुक्रवारी दिनांक 7 नोव्हेंबर रोजी गायीचे निधन झाले, तेव्हा या कुटुंबाने एखाद्या सौभाग्यवती स्त्रीच्या अंत्यविधीला लाजवेल असा अंत्यविधी या गाईचा केला.
advertisement
या बहुळी गायीच्या अंत्यविधीला वाजंत्री बोलवण्यात आले. नवी कोरी साडी चोळी नेसवण्यात आली. गायीची ओटी भरली, अन् जड अंतःकरणाने आपल्या शेतातच अंत्यसंस्कार केले.
या गायीला आम्ही नव्हे तर आम्हाला या गायीने सांभाळले. लहान मुलांना जेव्हा गरज असेल तेव्हा आम्ही तिचे दूध काढायचो. या गायीने दिलेले गोऱ्हे विकून आम्ही 17 म्हशी घेतल्या. मुलं शिकत आहेत. आम्हाला आता मजुरी करावी लागत नाही. तिच्या याच उपकारातून उतराई होण्यासाठी आम्ही तिचे माणसाचेच अंत्यसंस्कार केले. याच गायीचे आम्ही दहावं आणि तेरावं देखील करणार असल्याचे सुनिता साबळे यांनी सांगितले.
view commentsLocation :
Jalna,Jalna,Maharashtra
First Published :
November 08, 2025 4:12 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
ती खरंच 'भाग्यलक्ष्मी' होती, पैसा आला, घर झालं! शेतकऱ्याने गायीला वाजत गाजत दिला अखेरचा निरोप, VIDEO

