Mumbai News: थर्टीफर्स्टसाठी मुंबईतील 'हे' टॉप 5 ठिकाणं, तुम्हाला माहितीये का? वाचा यादी

Last Updated:
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरला मुंबईतील प्रमुख पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. यामध्ये बांद्रा बँडस्टँड, मरीन लाईन्स, गिरगाव चौपाटी, फिनिक्स पॅलॅडियम मॉल (कुर्ला) आणि गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणांचा समावेश आहे. मात्र नागरिकांनी योग्य वेळ आणि सुरक्षिततेचा विचार करूनच भेट द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
1/7

advertisement
2/7
 31 डिसेंबरला बांद्रा बँडस्टँड (Bandra Bandstand) हे तरुणांमध्ये आणि पर्यटकांमध्ये अतिशय लोकप्रिय ठिकाण ठरते. समुद्रकिनाऱ्यालगत फेरफटका, फोटो काढणे आणि मोकळी हवा यासाठी हे ठिकाण ओळखले जाते. मात्र संध्याकाळनंतर येथे मोठी गर्दी जमते. त्यामुळे शांतपणे फिरायचे असल्यास दुपारी किंवा संध्याकाळी 5–6 वाजेपर्यंत जाणे अधिक योग्य ठरते. रात्री उशिरा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येतो.

3/7
 नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मरीन ड्राइव्ह (Marine Lines /Marine Drive) हे मुंबईतील सर्वात गजबजलेले ठिकाण मानले जाते. “क्वीन ऑफ नेकलेस”चा रात्रीचा प्रकाशमय देखावा पाहण्यासाठी हजारो लोक येथे जमतात. सूर्यास्ताच्या सुमारास गेल्यास वातावरणाचा आनंद घेता येतो. मात्र रात्री 8 नंतर बसण्यासाठी जागा मिळणे कठीण होते आणि गर्दी प्रचंड वाढते.

4/7
 कुटुंबासोबत फिरण्यासाठी गिरगाव चौपाटी (Girgaon Chowpatty) हा चांगला पर्याय आहे. खाद्यपदार्थ, समुद्रकिनारा आणि मोकळा परिसर यामुळे येथे लोकांची मोठी गर्दी असते. संध्याकाळपर्यंत वातावरण आनंददायी असते, मात्र रात्री उशिरा गर्दी वाढल्याने लहान मुलांसोबत जाणाऱ्यांनी सावधगिरी बाळगावी.

5/7
 31 डिसेंबरला गर्दी टाळायची असल्यास मॉलमध्ये (Mall) वेळ घालवणे हा सुरक्षित आणि आरामदायी पर्याय ठरतो. खरेदी, जेवण आणि मनोरंजनासाठी फिनिक्स पॅलॅडियम मॉल लोकप्रिय आहे. संध्याकाळनंतर येथे प्रवेशासाठी रांगा लागण्याची शक्यता असते, त्यामुळे दुपारच्या वेळेत भेट देणे अधिक सोयीचे ठरते.

6/7
 गेटवे ऑफ इंडिया (Gateway of India) हे मुंबईचे प्रमुख पर्यटनस्थळ असून 31 डिसेंबरला येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस बंदोबस्त कडक असतो आणि रात्री थांबण्यावर काही निर्बंध असू शकतात. त्यामुळे येथे दिवसा भेट देणे अधिक सुरक्षित आणि सोयीचे मानले जाते.

7/7
 गर्दी टाळण्यासाठी दुपार ते संध्याकाळ हा वेळ सर्वोत्तम, सार्वजनिक वाहतूक वापरणे फायदेशीर, कुटुंबासोबत असल्यास उशिरा रात्री थांबणे टाळावे, सुरक्षितता आणि नियमांचे पालन करावे अशा महत्त्वाच्या सूचना मुंबईकरांना देण्यात येत आहेत.

BMC Election : दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
  • शिवसेना ठाकरे गटात आणि शिंदे गटात काही जागांवर थेट लढत असणार आहे.

  • ठाकरेंना बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी शिंदे गटाकडून आक्रमक डाव खेळला जात आहे.

  • ठाकरेंचा गेम करण्यासाठी शिंदे गटाने खेळी खेळली पण, त्यातच ते फसले आहेत.

View All
advertisement