IND vs PAK : 'तीन सिनियर खेळाडूंची हकालपट्टी करा', पराभवानंतर लालबुंद झाला शाहिद आफ्रिदी, LIVE कार्यक्रमात जावयाला सुनावले खडे बोल
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Shahid Afridi Angry On Pakistan Team : पाकिस्तानचा डाव अवघ्या 114 रन्सवर आटोपल्याने आफ्रिदीने टीममधील बड्या खेळाडूंवर कडक शब्दांत ताशेरे ओढले.
India vs Pakistan T20 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज मॅचमधील मानहानीकारक पराभवानंतर पाकिस्तानमध्ये मोठा संताप व्यक्त केला जात आहे. पाकिस्तानमध्ये नेहमीप्रमाणे टीव्ही फोडण्याची परंपरा कायम राखली गेली असून आता पाकिस्तानी खेळाडूंनी पुन्हा टीका करण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये पाकिस्तानचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदी याने (Shahid Afridi Angry On Pakistan Team) देखील थेट आपल्या जावयाचा टीममधून बाहेर काढण्याचा सल्ला दिला आहे.
आफ्रिदीचं एक विधान तुफान व्हायरल
पाकिस्तानच्या लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी दिग्गज खेळाडू शाहिद आफ्रिदी प्रचंड संतापला. पाकिस्तानचा डाव अवघ्या 114 रन्सवर आटोपल्याने आफ्रिदीने टीममधील बड्या खेळाडूंवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. सोशल मीडियावर आफ्रिदीचं एक विधान तुफान व्हायरल होतंय. यामध्ये त्याने पाकिस्तानच्या अशा तीन खेळाडूंची नावं सांगितली आहे, ज्यांना टीममधून बाहेर काढण्याचा सल्ला दिला आहे.
advertisement
Shahid Afridi said, "Drop Shaheen, drop Shadab, and drop Babar. They've always let us down in crucial big games. Try fresh faces against Namibia and give the new players a chance to build confidence".pic.twitter.com/6JPFIuKy0O
— Salman. (@TsMeSalman) February 15, 2026
advertisement
तीन सिनियर खेळाडूंची हकालपट्टी करा
शाहीन आफ्रिदी, शादाब खान आणि बाबर आझम यांना टीममधून ड्रॉप करा. या खेळाडूंनी महत्त्वाच्या आणि मोठ्या मॅचेसमध्ये नेहमीच आमची निराशा केली आहे, असं शाहिद आफ्रिदी म्हणाला. नामिबियाविरुद्धच्या पुढच्या मॅचमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी द्या. नवीन खेळाडूंना खेळवून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याची हीच खरी वेळ आहे, असंही शाहिद आफ्रिदी म्हणाला आहे.
advertisement
पाकिस्तान मोठे निर्णय घेणार?
दरम्यान, पाकिस्तानचा पुढील प्रवास आता कठीण झाला असून त्यांना सेमीफायनलच्या शर्यतीत टिकण्यासाठी मोठे निर्णय घ्यावे लागणार आहेत. आफ्रिदीच्या या विधानानंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड काय पावलं उचलतंय? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. भारताने मिळवलेल्या या मोठ्या विजयाने पाकिस्तानच्या गोटात मात्र चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 16, 2026 10:11 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : 'तीन सिनियर खेळाडूंची हकालपट्टी करा', पराभवानंतर लालबुंद झाला शाहिद आफ्रिदी, LIVE कार्यक्रमात जावयाला सुनावले खडे बोल









