advertisement

Jalna News: बँकेचं शटर तोडलं, लॉकर फोडलं; पण अचानक घडलं असं, कोट्यवधी सोडून पळाले चोर, जालन्याची घटना

Last Updated:

Jalna News: रात्रीच्या वेळी वडीगोद्री परिसरात काही गोरखी फिरत असतात. ते मोठ्याने काठ्या वाजवत फिरतात.

Jalna News: 5 चोरट्यांनी थेट बँकच फोडली, पण एक शिट्टी अन् डाव फसला; जालन्यात काय घडलं?
Jalna News: 5 चोरट्यांनी थेट बँकच फोडली, पण एक शिट्टी अन् डाव फसला; जालन्यात काय घडलं?
जालना: बुरखे घालून, तोंडाला रुमाल बांधून आलेल्या पाच चोरट्यांनी स्टेट बँक फोडली. शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कटरच्या सहाय्याने बँकेची लॉकर तोडण्याचा प्रयत्न केला. परंतु, एक शिट्टी वाजली अन् सगळा प्लॅन फसला. बँकेच्या लॉकरमधील दागिने आणि रोख रक्कम असा कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल वाचला आहे. जालन्यातील धुळे सोलापूर मार्गावरील वडीगोद्री येथील या प्रकाराने खळबळ उडाली आहे.
वडीगोद्री येथे धुळे-सोलापूर महामार्ग लगत स्टेट बँकेची शाखा आहे. या ठिकाणी शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. यानंतर लॉकरचे बाहेरील काही दरवाजेही तोडले. परंतु, लॉकरचे मजबूत लोखंडाचे आवरण असल्याने ते तुटले नाही. बराच वेळ उलटूनही चोरट्यांना ते न तुटल्याने चोरटे पळून गेले. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. चोरटे बँकेकडे येताना आणि जाताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत.
advertisement
गोरखीमुळे चोर पळाले
रात्रीच्या वेळी वडीगोद्री परिसरात काही गोरखी फिरत असतात. ते मोठ्याने काठ्या वाजवत फिरतात. दरम्यान, एक गोरखी रात्रीच्या वेळी फिरत होता. दरम्यान, चोरटे बँकेत घुसलेले होते. परंतु गोरखी काठ्या वाजवत येत असल्याने चोरटे पळून गेले. या गोरखीमुळे ही मोठी चोरी टळली आहे. त्यात दोन बुरखाधारी बँकेच्या मागील बाजूला असलेल्या ज्ञानगंगा इंग्लिश स्कूल येथील कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलीस तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
Jalna News: बँकेचं शटर तोडलं, लॉकर फोडलं; पण अचानक घडलं असं, कोट्यवधी सोडून पळाले चोर, जालन्याची घटना
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement