Vanita Kharat : लाट आली आणि सगळं वाहून गेलं! वनिता खरातच्या वरळी कोळीवाड्यातील 10×10 च्या घराची थक्क करणारी स्टोरी

Last Updated:
Vanita Kharat : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात बिकट परिस्थितीवर मात करत यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. नुकतचं MHJ Unplugged मध्ये तिने बालपणीच्या एका प्रसंगावर भाष्य केलं आहे.
1/7
 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात बिकट परिस्थितीवर मात करत आज यशाच्या शिखरावर पोहचली आहे. वरळी कोळीवाड्याची शान असणारी वनिताचं बालपण खूपच खडतर होतं.

advertisement
2/7
 MHJ Unplugged मध्ये वनिता खरातने आपल्या बालपणीच्या प्रसंगावर भाष्य केलं आहे. एकदा समुद्राची लाट आल्याने वनिताचं 10 × 10 चं वरळीतलं घर तुटलं होतं.

3/7
 वनिता खरात म्हणाली,"माझं घर समुद्राच्या किनाऱ्याला म्हणण्यापेक्षा समुद्रात आहे. अजूनही वरळी-कोळीवाड्यात माझं 10 × 10 चं घर आहे".

4/7
 वनिता म्हणाली,"घरातील मोरीचा पाईप थेट समुद्रात असतो. आधी घराच्या मागे बांध नव्हता तेव्हा भरतीच्यावेळी मोरीमधून पाणी बाहेर यायचं, वाळू यायची. त्यानंतर होणारी कसरत ही सवयीची झाली आहे. 20 जुलैच्या पावसात घरात प्रचंड पाणी शिरलं होतं. त्यावेळी आम्हाला काही करता आलं नव्हतं. आम्ही वाट पाहत बसलो होतो पाऊस कधी थांबणार आणि त्यानंतर तो सगळा चिखल कसा काढायचा".

5/7
 वनिता खरात पुढे म्हणाली,"आता तरी भींती झाल्या आहेत. आधी आमचं घर म्हणजे झोपडी होती. एकदा शाळेत असताना आम्ही जेवायला बसलो होतो. त्यावेळी एक मोठी लाट आली आणि अख्खी झोपडी तुटली होती. तेव्हा सगळेच खूप घाबरलो होतो. पण पुन्हा ते बांधलं".

6/7
 वनिता खरात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या पहिल्या पर्वाची अर्थात 'कॉमेडीचे जहागीरदार'ची विजेती होती. कॉलेजमध्ये एकांकिकापासून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या वनिताने 'कबीर सिंग' सारख्या बॉलिवूडच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांतही काम केलं आहे.

7/7
 वनिता खरातचा मोठा चाहतावर्ग आहे. आता तिच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement