Election : एकाच निवडणुकीत दोनदा मतदान केलं तर काय होतं? याची शिक्षा किती कठोर?

Last Updated:

हा अधिकार वापरताना काही जबाबदाऱ्या सुद्धा असतात त्यातील एक महत्त्वाची म्हणजे "एक व्यक्ती, एक मत." अनेकदा काही लोक निष्काळजीपणे किंवा जाणूनबुजून दोनदा मतदान करतात, पण ही छोटीशी चूक नसून भारतीय कायद्याने गंभीर गुन्हा मानली जाते.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे आणि इथं प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार हा संविधानाने दिलेला आहे. पण हा अधिकार वापरताना काही जबाबदाऱ्या सुद्धा असतात त्यातील एक महत्त्वाची म्हणजे "एक व्यक्ती, एक मत." अनेकदा काही लोक निष्काळजीपणे किंवा जाणूनबुजून दोनदा मतदान करतात, पण ही छोटीशी चूक नसून भारतीय कायद्याने गंभीर गुन्हा मानली जाते.
अलीकडे बिहारच्या निवडणुकांदरम्यान अशाच एका प्रकरणाने वाद पेटवला आहे. पटन्याच्या बांकीपूर येथे मतदानाच्या वेळी समस्तीपूरच्या खासदार शांभवी चौधरी यांचा एक व्हिडिओ समोर आला, ज्यात त्यांच्या दोन्ही हातांवरील शाईचे निशाण दिसल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. त्यामुळे दोनदा मतदान केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आता प्रश्न असा, जर कुणी खरोखरच दोनदा मतदान केलं, तर काय होईल?
advertisement
दोनदा मतदान करणं म्हणजे कायद्याने गुन्हा
भारतीय संविधान आणि जनप्रतिनिधित्व अधिनियम 1951 नुसार, प्रत्येक नागरिकाला फक्त एकदाच आणि एका मतदारसंघात मतदान करण्याचा अधिकार आहे.
जर एखादी व्यक्ती जाणीवपूर्वक किंवा फसवणुकीच्या उद्देशाने दोनदा मतदान करत असेल, तर ते कलम 62(4) आणि कलम 31 अंतर्गत गुन्हा मानला जातो.
ही तरतूद फक्त मतदानाच्या दिवशीच लागू नाही, तर मतदार यादी तयार करतानाही लागू होते. म्हणजेच जर कुणाचं नाव दोन वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये नोंद झालं असेल, तर तेही कायदेशीर गुन्हा ठरतो.
advertisement
कोणत्या कलमानुसार आणि किती शिक्षा होऊ शकते?
जनप्रतिनिधित्व अधिनियमाचं कलम 31 असं सांगतं की जर एखादी व्यक्ती जाणीवपूर्वक स्वतःचं नाव एकापेक्षा अधिक मतदारसंघात नोंदवत असेल किंवा दोन ठिकाणी मतदान करत असेल, तर त्याला दोषी ठरवलं जाईल.
या गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त सहा महिन्यांची कैद, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. म्हणजेच, अशा प्रकारे दोनदा मतदान करणाऱ्याला तुरुंगवासासह आर्थिक शिक्षा भोगावी लागू शकते.
advertisement
गुन्हा कसा सिद्ध होतो?
आजच्या काळात निवडणूक आयोगाकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. ईव्हीएम मशीन, मतदार यादी वेरिफिकेशन सिस्टम आणि बायोमेट्रिक पडताळणीच्या माध्यमातून अशा गैरव्यवहारांची तपासणी केली जाते. जर एखाद्या व्यक्तीचं नाव, ओळखपत्र किंवा फिंगरप्रिंट दोन ठिकाणी आढळलं, तर त्याला डुप्लिकेट मतदार घोषित केलं जाऊ शकतं. अशा प्रकरणांमध्ये जिल्हा निवडणूक अधिकारी किंवा पोलिसांकडून एफआयआर नोंदवली जाते.
advertisement
जर मतदान केंद्रावरच एखाद्याला दोनदा मतदान करताना पकडलं गेलं, तर त्या ठिकाणीच त्याला हिरासत घेण्याचं अधिकार अधिकाऱ्यांना आहे.
मुद्दाम की चुकून?
जर व्यक्तीने जाणूनबुजून दोनदा मतदान केलं, तर ते आपराधिक हेतू मानलं जातं आणि त्यावर शिक्षा ठरलेलीच असते.
पण जर हे अनवधानाने, म्हणजे नाव दोन ठिकाणी राहिलं आणि व्यक्तीला माहिती नव्हती, असं आढळलं, तर तपासानंतर निवडणूक अधिकारी चेतावणी देऊन प्रकरण निकाली काढू शकतात. मात्र आता डिजिटल पडताळणीमुळे अशा चुका होण्याची शक्यता जवळपास नगण्य आहे.
advertisement
निवडणूक आयोगाचा कठोर इशारा
भारतीय निवडणूक आयोगानं स्पष्ट सांगितलं आहे की , एक व्यक्ती, एक मत ही लोकशाहीची आत्मा आहे. जो कोणी या नियमाचं उल्लंघन करतो, तो केवळ कायदा तोडत नाही, तर लोकशाहीच्या विश्वासाशीही विश्वासघात करतो. म्हणूनच आयोग अशा प्रत्येक प्रकरणाला गंभीरतेने घेतो आणि आवश्यक ती कायदेशीर कारवाई करतो.
view comments
मराठी बातम्या/देश/
Election : एकाच निवडणुकीत दोनदा मतदान केलं तर काय होतं? याची शिक्षा किती कठोर?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement