Pune News: 4 वेळा दृश्यम पाहिला, बायकोला भट्टीत जाळलं अन्... पुण्याच्या शिक्षिकेसोबत भयंकर कृत्य
- Published by:Prachi Amale
Last Updated:
पुण्यात चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या केल्याचे तपासातून उघड झाले आहे.
पुणे : चारित्राच्या संशयातून पुण्यात पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. ही घटना वारजे माळवाडी परिसरात घडली आहे. खळबळजनक बाब म्हणजे पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने एका लोखंडी भट्टीत पत्नीचा मृतदेह जाळून टाकला आहे. पतीने हे भयंकर कृत्य दृश्यम चित्रपट पाहून केल्याचे समोर आले. पत्नीची निर्घृण हत्या केल्यानंतर पती स्वत:पोलीस ठाण्यात गेला आणि बायको बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांच्या तपासात पतीचे बिंग फुटले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, समीर जाधव पतीचे आणि तर अंजली जाधव असे मृत पत्नीचे नाव आहे. समीर आणि अंजली हे पुण्यात शिवणे परिसरात राहायला आहेत.समीर हा अमरावतीचा रहिवासी असून फॅब्रिकेशनचे काम करतो. तर पत्नी एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करते. समीर आणि अंजलीला दोन मुले असून २०१७ मध्ये त्यांचा विवाह झाला होता. एक मुलगा तिसरी आणि दुसरा मुलहा पाचवीत शिक्षण घेत होता. चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या केल्याचे तपासातून उघड झाले आहे. हा पूर्वनियोजित कट असून मुलं दिवाळीच्या सुट्टीत गावी गेल्यानंतर त्याने पत्नीची हत्या केली.
advertisement
पत्नीचा काटा काढण्यासाठी पतीचा कट
आरोपी पती पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत वारंवार तिच्याशी वाद घालत असे. महत्त्वाचे म्हणजे आरोपी पतीचेच एका महिलेशी अनैतिक संबंध होते. चारित्र्यावर संशय घेत त्याने बायकोच्या एका मित्राला आय लव्ह यू चा मेसेज केला आणि मित्राने त्या मेसेजला रिप्लाय केल्याने वाद आणखी वाढला. त्यानंतर पतीने पत्नीचा काटा काढायचे ठरवले, त्यासाठी त्याने एक कट देखील रचला.
advertisement
सीसीटीव्ही तपासात बिंग फुटले
खेड शिवापूरजवळ गोगलवाडी येथे पतीने एक गोडाऊन भाड्याने घेतले.२६ ऑक्टोबरला कार घेऊन तो बायकोला गोडाऊन दाखवायला घेऊन गेला. त्याच ठिकाणी त्याने बायकोची गळा दाबून हत्या केली.मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने एक भट्टी देखील तयार केली होती. या भट्टीत पत्नीचा मृतदेह जाळला आणि राख नदीत फेकून दिली. त्यानंतर त्याने दुसऱ्या दिवशी बायको मिसिंग झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात जाऊन दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही तपास केला असता त्यानेच हे केले असल्याचे समोर आले.
advertisement
कसा केला हत्येचा उलगडा?
पतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी बेपत्ता बायकोचा तपास करण्यास सुरूवात केली. सीसीटीव्ही आणि इतर माध्यमातून तपास केला असता. तक्रारदार नवऱ्याच्या हालचाली हत्येच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासकरून पोलिसांनी हत्येचा उलगडा लावला. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 08, 2025 5:22 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: 4 वेळा दृश्यम पाहिला, बायकोला भट्टीत जाळलं अन्... पुण्याच्या शिक्षिकेसोबत भयंकर कृत्य


