Asia Cup मध्ये मोठा उलटफेर! अफगाणिस्तानच्या विजयानंतर 2 टीम सुपर-4 मध्ये पोहोचणार, पाहा कोण?

Last Updated:

Asia Cup 2025 Super 4 : जर अफगाणिस्तानने आजची मॅच जिंकली तर त्यांचे 4 गुण होतील आणि त्यांचा सुपर 4 मधील प्रवेश निश्चित होईल.

Afghanistan Super 4 Qualification scenario
Afghanistan Super 4 Qualification scenario
Afghanistan Super 4 Qualification scenario : आशिया कप 2025 मधील ग्रुप 'बी' मधील समीकरणे आता रोमांचक झाली आहेत. आजच्या मॅचमध्ये जर अफगाणिस्तानने विजय मिळवला, तर श्रीलंका आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघ थेट उपांत्य फेरी (Super 4) साठी पात्र ठरतील. दोन्ही टीम्सनी स्पर्धेत चांगली सुरुवात केली आहे. प्रत्येकाने आपला पहिला सामना जिंकून 2 गुण मिळवले आहेत आणि त्यांचा नेट रनरेटही चांगला आहे.

सुपर 4 मधील प्रवेश निश्चित?

श्रीलंकेच्या मॅचचा निकाल ग्रुपमधील दोन संघांचे भविष्य ठरवेल. जर अफगाणिस्तानने आजची मॅच जिंकली तर त्यांचे 4 गुण होतील आणि त्यांचा सुपर 4 मधील प्रवेश निश्चित होईल. श्रीलंका संघाने देखील आपला पहिला सामना जिंकला असल्याने त्यांचेही 2 गुण आहेत. अफगाणिस्तानने विजय मिळवल्यास दोन्ही संघांचे प्रत्येकी 4 गुण होतील. त्यामुळे, ते कोणत्याही परिस्थितीत ग्रुपमधील टॉप 2 मध्ये राहतील.
advertisement

जो संघ जिंकेल तो...

दरम्यान, या परिस्थितीत बांगलादेश आणि हाँगकाँगचे आव्हान संपुष्टात येईल. त्यांना सुपर 4 मध्ये पोहोचण्यासाठी अफगाणिस्तानचा पराभव होणे आणि त्यांचा निव्वळ रनरेट चांगला असणे आवश्यक आहे. ग्रुप बी मधील अनिश्चितता पाहता उद्याच्या मॅचकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जो संघ जिंकेल तो आपलं स्थान अधिक भक्कम करेल.
advertisement

भारत Super 4 साठी क्वालिफाय

आशिया कपच्या ग्रुप ए मध्ये भारताने सेमीफायनलसाठी क्वालिफाय केलं आहे. तर पाकिस्तान किंवा युएई या दोन्हीपैकी एखादी टीम सेमीफायनलमध्ये पोहोचणार आहे. ओमानने दोन सामने गमावल्याने ओमानचा संघ आधीच आशिया कपमधून बाहेर पडला आहे. त्यामुळे आता सुपर 4 च्या लढती अधिक रोमांचक होतील.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup मध्ये मोठा उलटफेर! अफगाणिस्तानच्या विजयानंतर 2 टीम सुपर-4 मध्ये पोहोचणार, पाहा कोण?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement