वकील अन् नागरिकांना मोठा दिलासा! कोल्हापूर-कलबुर्गी एक्स्प्रेस 'या' तारखेपासून सुरू, कधीपासून सुरूय बुकिंग?

Last Updated:

Kolhapur-Kalburgi Express : सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांची प्रलंबित मागणी अखेर पूर्ण झाली आहे. कोल्हापूर-कलबुर्गी-कोल्हापूर रेल्वेसेवा या तारखेपासून सप्टेंबरपासून सुरू होत असून, आजपासून...

Kolhapur-Kalburgi Express
Kolhapur-Kalburgi Express
Kolhapur-Kalburgi Express : बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेली कोल्हापूर-कलबुर्गी-कोल्हापूर रेल्वेसेवा (Kolhapur-Kalburgi Express) 24 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्याचं बुकिंग आजपासून (दि. 16 सप्टेंबर) सुरू झालेले आहे. ही गाडी सकाळच्या सत्रात (शुक्रवार वगळता) धावणार असून, कोल्हापूर ते कुर्डूवाडी दरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबणार असल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विशेषतः, सोलापूर जिल्ह्यातून कोल्हापूर उच्च न्यायालयात कामकाजासाठी जाणाऱ्या वकील आणि नागरिकांसाठी ही गाडी अत्यंत सोयीची ठरणार आहे, कारण ती पहाटेच कोल्हापूरला पोहोचेल.
गाडीचा मार्ग आणि थांबे
सहा स्लीपर, चार थ्री-टिअर एसी आणि सहा जनरल डब्यांसह ही गाडी प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. या गाडीला हातकणंगले, जयसिंगपूर, मिरज, बेळंकी, सलगरे, कवठेमहांकाळ, लंगरपेठ, ढालगाव, जत रोड, सांगोला, पंढरपूर, मोडनिंब, कुर्डूवाडी आणि सोलापूर यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. यामुळे सांगोला तालुक्यातील प्रवाशांना सोलापूरला जाण्यासाठी आणि येण्यासाठी मोठा दिलासा मिळणार आहे.
advertisement
मागणी अखेर पूर्ण
शहीद अशोक कामटे संघटनेने या रेल्वेसेवेची मागणी केली होती. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, खासदार प्रणिती शिंदे, चेतनसिंह केदार-सावंत आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक धर्मवीर मीना यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही मागणी आता पूर्णत्वास आली आहे. कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच झाल्याने, या नव्या रेल्वेमुळे सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांची आणि वकिलांची मोठी सोय झाली आहे.
advertisement
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
वकील अन् नागरिकांना मोठा दिलासा! कोल्हापूर-कलबुर्गी एक्स्प्रेस 'या' तारखेपासून सुरू, कधीपासून सुरूय बुकिंग?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement