Operation Sindoor: ‘तुकडे तुकडे झाले, चिंधड्या उडाल्या..’, मसूदच्या कुटुंबीयांचं काय झालं? ‘जैश’ कमांडरने सगळं सांगितलं

Last Updated:

Operation Sindoor : या ऑपरेशन सिंदूरमध्ये जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझरच्या कुटुंबातील सदस्य ठार झाले. आता, याबाबत जैशच्या दहशतवाद्याने महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

‘तुकडे तुकडे झाले, चिंधड्या उडाल्या..’, मसूदच्या कुटुंबीयांचं काय झालं? ‘जैश’ कमांडरने सगळं सांगितलं
‘तुकडे तुकडे झाले, चिंधड्या उडाल्या..’, मसूदच्या कुटुंबीयांचं काय झालं? ‘जैश’ कमांडरने सगळं सांगितलं
नवी दिल्ली: पहलगाममध्ये भारतीय नागरिकांची दहशतवाद्यांनी हत्या केली. त्यानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर या मोहिमेची आखणी करत दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ले केले. या हल्ल्यात अनेक दहशतवादी ठार झाले होते. या ऑपरेशन सिंदूरमध्ये जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझरच्या कुटुंबातील सदस्य ठार झाले. आता, याबाबत जैशच्या दहशतवाद्याने महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
advertisement
ऑपरेशन सिंदूर नंतर काही महिन्यांनी, दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर मसूद इलियास काश्मिरी याचे वक्तव्य समोर आले आहे. भारताने ७ मे रोजी बहावलपूर येथील दहशतवादी तळावर हल्ला केला तेव्हा दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील सदस्य ठार झाल्याची कबुली त्याने दिली आहे.
advertisement
जैश कमांडर मसूद इलियास काश्मिरी याने सांगितले की, या हल्ल्यात मसूद अझहरच्या कुटुंबाला खूप त्रास सहन करावा लागला आणि कुटुंबातील अनेक सदस्य मारले गेले. बहावलपूर हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील एक शहर आहे. येथे मरकझ सुभान अल्लाह नावाच्या ठिकाणी जैश-ए-मोहम्मद (जेईएम) चे मुख्यालय आहे. पाकिस्तानच्या आत 100 किलोमीटर खोलवर असलेल्या ऑपरेशन सिंदूरमधील हा सर्वात प्रमुख आणि प्राणघातक हल्ला होता. भारतीय सैन्याने ऑपरेशन अंतर्गत जैशच्या मुख्यालयाला लक्ष्य केले. या हल्ल्यात दहशतवाद्यांचा हा संपूर्ण तळ उद्ध्वस्त झाला. दहशतवादी मसूद अझहरचे कुटुंब या जैश तळात राहत होते. भारतीय हवाई दलाच्या स्ट्राइकमध्ये मसूदच्या कुटुंबातील सदस्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले असल्याचे इलियासने सांगितले. मसूदचे कुटुंबीय ठार झाल्याने दहशतवादी संघटना आणि पाकिस्तानलाही हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात होते.
advertisement
भारताच्या हल्ल्यात मरकझ सुभान अल्लाह उद्ध्वस्त झाला असल्याचे सॅटेलाइट इमेजमधून स्पष्ट झाले. हल्ल्यानंतर, भारतीय लष्कराच्या प्रवक्त्या कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत पुष्टी केली की हे जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय आहे. भारताविरुद्ध अनेक हल्ले याच ठिकाणावरून रचण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या वृत्तानुसार, ऑपरेशन सिंदूरमध्ये उद्धवस्त झालेले दहशतवादी तळ, संघटनांच्या मुख्यालयाचे बांधकाम सुरू असल्याचा दावा करण्यात आला.
advertisement
view comments
मराठी बातम्या/देश/
Operation Sindoor: ‘तुकडे तुकडे झाले, चिंधड्या उडाल्या..’, मसूदच्या कुटुंबीयांचं काय झालं? ‘जैश’ कमांडरने सगळं सांगितलं
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement