अनाउंसमेंटही केली, नंतर का गुंडाळला 'जत्रा 2'? केदार शिंदेंने सांगितलं कारण; म्हणाले, 'भरतने मला...'

Last Updated:
Kedar Shinde on Jatra 2 : जत्रा या कल्ट क्लासिक सिनेमानंतर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी जत्रा 2ची घोषणा केली होती. मात्र तो सिनेमा अचानक बंद करावा लागला. यामागचं कारण त्यांनी सांगितलं आहे.
1/7
मराठी सिनेसृष्टीतील काही कल्ट क्लासिक सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणजे जत्रा. या सिनेमातील प्रत्येक पात्र आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. सध्या सिनेमांच्या सीक्वेलचा ट्रेंड आहे. त्यात जत्रा 2 येणार अशा चर्चा होत्या.

advertisement
2/7
दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्याची घोषणाही केली होती. पण नंतरच्या काळात याबाबत कोणतीही अपडेट समोर आली नाही. खरंच जत्रा 2 येणार का याबद्दल दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सांगितलं.
दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्याची घोषणाही केली होती. पण नंतरच्या काळात याबाबत कोणतीही अपडेट समोर आली नाही. खरंच जत्रा 2 येणार का याबद्दल दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सांगितलं.
advertisement
3/7
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत केदार शिंदे यांनी सांगितलं की जत्रा 2 येणार होता. पण तो आता येणार नाही. त्यामागचं कारणही त्यांनी सांगितलं.
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत केदार शिंदे यांनी सांगितलं की जत्रा 2 येणार होता. पण तो आता येणार नाही. त्यामागचं कारणही त्यांनी सांगितलं.
advertisement
4/7
केदार शिंदे म्हणाले,
केदार शिंदे म्हणाले, "मी जत्रा 2 जाहीर केला होता. कथा माझ्याकडे होती. पण मला भरतने अडवलं होतं, तो म्हणाल की थोडं थांब. या सिनेमाची कथा कदाचित दुसऱ्या सिनेमाशी मिळती जुळती आहे. तू चौकशी करत. मी चौकशी केली तेव्हा त्यातला 10 टक्के भाग हा एका सिनेमाशी मिळता जुळता होता. आम्ही सिनेमा करणं थांबवलं."
advertisement
5/7
केदार शिंदे यांनी पुढे सांगितलं की,
केदार शिंदे यांनी पुढे सांगितलं की, "प्रियदर्शन जाधवने जत्रासाठी लिखाण केलं होतं. त्याचाच तो सिनेमा होता. मी त्याला विचारलं म्हटलं माझीसुद्धा अशीच कथा आहे. त्यावर तोही म्हणाला की जत्रा 2शी जुळत आहे. त्यामुळे मी ही म्हटलं की नको करूया."
advertisement
6/7
 "मला आजही अनेक लोक विचारतात की जत्रा 2 का काढत नाही. मला मनापासून करावासा वाटत पण या सिनेमानं एक बेंचमार्क सेट करून ठेवला आहे आणि आता त्याच्या जवळपास जरी गेलो नाही तर एक चांगला ब्रँड खराब होईल."

7/7
"आजही गावागावात मुलं, तरुण, वयोवृद्ध लोख भेटतात आणि आम्ही तुमचा जत्रा पाहिला असं प्रेमाने सांगतात. हा एक वेगळा अनुभव असतो माझ्यासाठी", असंही केदार शिंदे यांनी सांगितलं.
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement