ICC कडून पाकिस्तानचा भलताच लाड! युएईविरुद्धच्या सामन्यात झाला मोठा बदल, टीम इंडियाला 'जोर का झटका'?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Andy Pycroft In PAK vs UAE : झिम्बाब्वेचे पायक्रॉफ्ट पाकिस्तानच्या पुढील मॅचसाठी सुद्धा रेफरी होते. पाकिस्तानचा पुढील सामना आज यूएईसोबत होणार आहे. अशातच आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
Pakistan Drama In Asia Cup : आशिया कप (Asia Cup 2025) मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅचमध्ये हँडशेक न झाल्यामुळे निर्माण झालेला वाद आता आणखी वाढला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आयसीसीकडे (ICC) मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट (Andy Pycroft) यांच्या विरोधात तक्रार केली होती. पायक्रॉफ्ट यांना आशिया कपमधून (Asia Cup) तात्काळ हटवण्याची मागणी पीसीबीने केली होती, पण आयसीसीने ही मागणी फेटाळून लावली. मात्र, आता समोर आलेल्या नवीन माहितीनुसार, पाकिस्तानला मोठा दिलासा दिला गेला आहे.
रेफरी पायक्रॉफ्ट यांना आराम
आयसीसीने पायक्रॉफ्ट यांना आजच्या पाकिस्तान आणि यूएई मॅचमधून दूर ठेवले आहे. झिम्बाब्वेचे पायक्रॉफ्ट पाकिस्तानच्या पुढील मॅचसाठी सुद्धा रेफरी होते. पाकिस्तानचा पुढील सामना आज यूएईसोबत होणार आहे. मात्र, 'टाइम्स ऑफ इंडिया' च्या रिपोर्टनुसार, त्यांना 'आराम' दिला जाऊ शकतो. पाकिस्तानने बुधवारी होणारी आपली मॅचपूर्वीची पत्रकार परिषदही रद्द केली आहे. पीसीबीच्या एका सूत्राने सांगितले की, पाकिस्तान टूर्नामेंट खेळणार आहे, पण अँडी पायक्रॉफ्ट यूएईविरुद्धच्या मॅचमध्ये रेफरी असणार नाहीत. पायक्रॉफ्ट पाकिस्तानच्या पुढील मॅचमध्ये रेफरी असतील की नाही, हे अजून स्पष्ट झालेले नाही.
advertisement
आयसीसीकडे तक्रार
पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी एका पोस्टमध्ये म्हटले होते की, पीसीबीने एमसीसी (MCC) नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल मॅच रेफरीच्या विरोधात आयसीसीकडे तक्रार दाखल केली आहे. पीसीबीने मॅच रेफरींना आशिया कपमधून तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे. पण नंतर त्यांनी ही पोस्ट हटवली.
पाकिस्तानचं पॅकअप होणार?
advertisement
दरम्यान, भारत आणि पाकिस्तानने मंगळवारी आयसीसी अकादमीमध्ये सराव केला. दोन्ही संघांच्या सरावाची वेळ वेगवेगळी होती, पण ते जवळपास एक तास एकाच ठिकाणी होते. भारताने आधीच सुपर फोरमध्ये आपली जागा निश्चित केली आहे, तर पाकिस्तानला पुढील फेरीत पोहोचण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत शेवटचा सामना जिंकावा लागेल. जर ते यूएईला हरवण्यात यशस्वी झाले तर पुढील रविवारी त्यांचा सामना पुन्हा एकदा भारतीय संघासोबत होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 17, 2025 8:37 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
ICC कडून पाकिस्तानचा भलताच लाड! युएईविरुद्धच्या सामन्यात झाला मोठा बदल, टीम इंडियाला 'जोर का झटका'?