Weather Alert: कोकणात पुन्हा मुसळधार, 3 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा, मुंबई-ठाण्याचं हवामान अपडेट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला असून कोकणात देखील धो धो सुरूच आहे. दक्षिण कोकणात आज पुन्हा यलो अलर्ट असून मुंबईसह ठाण्यातील हवामान अंदाज जाणून घेऊ.
1/5
गेल्या तीन दिवसांपासून मुंबईसह कोकणकिनारपट्टीवर जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र आज हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अनेक भागात पाऊस मध्यम स्वरूपाचा असेल तर काही ठिकाणी सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघरसह कोकणात आज पावसाची परिस्थिती कशी असेल तर पाहुया.

advertisement
2/5
मुंबईत आज हवामान तुलनेने सौम्य राहील. सकाळपासून ढगाळ वातावरण असून अधूनमधून रिमझिम सरी बरसतील. काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. गेल्या तीन दिवसांच्या तुलनेत पावसाची तीव्रता आज कमी राहील. कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता आहे. वारे सौम्य गतीने वाहतील.

3/5
ठाणे आणि नवी मुंबईतही आज आकाश ढगाळ राहील. दिवसभर रिमझिम सरी आणि अधूनमधून मध्यम पावसाच्या सरींची शक्यता आहे. या भागातही तापमान मुंबईसारखेच राहील. कमाल तापमान 28 अंश सेल्सिअसच्या आसपास तर किमान तापमान 24 ते 25 अंश सेल्सिअस राहील. वारे सौम्य असतील.

4/5
पालघर जिल्ह्यात हवामान विभागाने कोणताही अलर्ट दिलेला नाही. तरीही आज काही भागात रिमझिम ते मध्यम पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे. वातावरण ढगाळ राहील. तापमान साधारण 28 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल तर रात्री ते 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.

5/5
कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मात्र हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. आज दिवसभर ढगाळ वातावरण राहून जोरदार पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. किनारपट्टी भागात वार्‍याचा वेग वाढू शकतो. या जिल्ह्यांमध्ये तापमान 29 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता असून किमान तापमान 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement