'पोरक्या' झालेल्या चिमुरड्यासाठी सुनेत्रा वहिनी घराबाहेर पडणार, उपमुख्यमंत्री होताच पहिला दौरा, दादांच्या पावलावर पाऊल!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच दौऱ्यासाठी बाहेर पडणार आहे.
बारामती : उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच दौऱ्यासाठी बाहेर पडणार आहे. सोमवार 2 फेब्रुवारीला सुनेत्रा पवार या कराड आणि फलटण तालुक्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी 11 वाजता सुनेत्रा पवार या कराड येथील प्रितीसंगम बाग येथे जातील. त्यानंतर सुनेत्रा पवार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन पुष्पमाला अर्पण करून त्यांना आदरांजली वाहतील.
दुपारी 11 वाजता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या फलटणला रवाना होतील. फलटणमध्ये सुनेत्रा पवार या विदीप जाधव यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतील आणि त्यांच्या दु:खात सहभागी होतील, यानंतर सुनेत्रा पवार पुन्हा बारामतीला रवाना होतील.
9 वर्षांच्या चिमुरड्याला भेटणार
28 जानेवारीला बारामती विमानतळावर अजित पवारांचं विमान कोसळलं, ज्यामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला, यामध्ये अजित पवारांसोबत असलेले पोलीस सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांचाही समावेश होता. विदीप जाधव हे मूळचे फलटण तालुक्यातील लोणंद, तरडगावचे रहिवासी आहेत. सुनेत्रा पवार या विदीप जाधव यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटंबाचं सांत्वन करणार आहेत. 7 वर्षांपासून विदीप जाधव हे अजित पवारांसोबत त्यांचे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. बुधवारी अजित पवार मुंबईहून बारामतीला निघाले तेव्हाही विदीप जाधव त्यांच्यासोबत विमानात बसले होते, पण बारामतीमध्ये विमान लँड व्हायच्या आधीच कोसळलं, ज्यात विमानातल्या सगळ्यांचा मृत्यू झाला.
advertisement
विदीप जाधव यांच्यावर बुधवारी रात्री त्यांच्या मूळ गावी तरडगाव येथे रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना त्यांच्या 9 वर्षाच्या चिमुकल्याने मुखाग्नी दिला.
28 जानेवारीला अजितदादांचं निधन झाल्यानंतर त्यांच्यावर 29 जानेवारीला बारामतीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर 31 जानेवारीला सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शनिवारी शपथविधी झाल्यानंतर सुनेत्रा पवार या तडक बारामतीला निघून गेल्या. अजित पवार यांचे सगळे धार्मिक कार्यक्रम आटपूनच सुनेत्रा पवार या मंत्रालयामध्ये पाऊल ठेवणार आहेत.
Location :
Baramati,Pune,Maharashtra
First Published :
Feb 01, 2026 11:49 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'पोरक्या' झालेल्या चिमुरड्यासाठी सुनेत्रा वहिनी घराबाहेर पडणार, उपमुख्यमंत्री होताच पहिला दौरा, दादांच्या पावलावर पाऊल!








