सोनाली राऊतचा गेम ओव्हर! अॅटिट्यूड नडला की टास्कमधली आळस? ग्लॅमरस क्वीन बिग बॉसमधून आऊट
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Sonali Raut is out of Bigg Boss House: घरातील ग्लॅमरचा तडका मानली जाणारी सोनाली राऊत आता या स्पर्धेतून बाहेर पडली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मागील भागात रितेश देशमुखने सोनालीची ज्या पद्धतीने कानउघाडणी केली, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. "सोनाली, हा तुमचा अ‍ॅटिट्यूड तुमच्या घरी ठेवा, या घरात सगळे स्पर्धक समान आहेत. टास्क खेळायला आला आहात ना, मग नखरे कशासाठी?" अशा शब्दांत रितेशने तिला खडसावलं होतं. इतकंच नाही, तर "पुढच्या वेळी घराबाहेर काढेन," असा दमही भरला होता. रितेशचे ते शब्द आता शब्दशः खरे ठरले असून, सोनालीला चक्क घराबाहेर जावं लागलं आहे.
advertisement
या आठवड्यात नॉमिनेशनमध्ये दिपाली सय्यद, विशाल कोटियन, प्रभू शेळके, प्राजक्ता शुक्रे, करण सोनावणे, ओमकार राऊत आणि रुचिता जामकर यांसारख्या तगड्या नावांचा समावेश होता. या सर्व दिग्गजांमध्ये सोनाली प्रेक्षकांची मनं जिंकण्यात आणि मतं मिळवण्यात कमी पडली. तिचा अतरंगी ड्रामा प्रेक्षकांसाठी सुरुवातीला मजेशीर होता, पण खेळाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर तिची उदासीनता चाहत्यांना खटकली आणि त्यांनी तिला मतं देणं थांबवलं.









