'फक्त अजितदादांचा तेरावा होऊन जाऊ द्या, मग मी सगळं सांगतो', रोहित पवार स्पष्टच म्हणाले
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांमध्ये भारतीय जनता पक्षाने आपले मत मांडल्याने आता प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे.
मुंबई : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मात्र तशी शक्यता फेटाळून लावली. जर अजित पवार यांच्याकडून विलिनीकरणाची चर्चा सुरू होती तर त्यांनी मला निश्चित सांगितले असते, असे म्हणून आताच्या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचे त्यांनी सूचित केले. तसेच अजित पवार यांच्या अपघाताआधी मी त्यांच्याशी तासभर बोललो होतो. मी भरपूर काही सांगू शकतो, असेही फडणवीस म्हणाले. या सगळ्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी सूचक वक्तव्य केले.
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांमध्ये भारतीय जनता पक्षाने आपले मत मांडल्याने आता प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे. अजित पवार यांची इतर नेत्यांशी विलिनीकरणाच्या अनुषंगाने चर्चा सुरू असती तर मला सांगितले असते, असे म्हणून अशा कोणत्याही चर्चा सुरू नव्हत्या, असेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचित केले. त्यावर अजित पवार यांचा तेराव्याचा विधी झाला की सगळं सांगतो, असा इशारा रोहित पवार यांनी दिला.
advertisement
विलिनीकरणाच्या बाबतीत काय चर्चा झाली?
विलिनीकरणाच्या अनुषंगाने काही दावे प्रतिदावे सुरू आहेत. पवार घराण्यातच सध्या दु:खाचे वातावरण आहे. एकदा अजित पवार यांच्या तेराव्याचा धार्मिक विधी होऊ द्यात. विलिनीकरणाच्या बाबतीत काय काय चर्चा झाली होती ते मी सांगतो, असे रोहित पवार म्हणाले.
अनुभवी नेत्यांचे म्हणणे सुनेत्रा काकींनी ऐकले असावे
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीसाठी घाई झाली का, असे विचारले असता रोहित पवार म्हणाले, त्यांचा पक्ष वेगळा आहे. त्यांचे पक्षाचे प्रमुख लोक प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे हे त्या अनुषंगाने चर्चा करीत होते. मुख्यमंत्री यांच्याशी बोलत होते. मला असे कळाले की त्यानंतर त्यांची सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा झाली. या बोलण्यानंतरच सुनेत्रा काकी पवार यांच्या शपथविधीचा निर्णय घेण्यात आला. अनुभवी नेत्यांचे म्हणणे सुनेत्रा काकींनी ऐकले असावे. तेरावा होत नाही तोपर्यंत आम्ही कोणतीही राजकीय भूमिका घेणार नाही.
advertisement
दादांसोबत काय काय चर्चा झाली हे तेराव्यानंतर सांगेन
देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, मी पत्रकार परिषद घेऊन त्या संदर्भात भाष्य करणार आहे. आता राजकीय बोलणे योग्य होणार नाही. दादांसोबत काय चर्चा झाली हे मी सांगेन. कारण या सगळ्या प्रक्रियेत मी होतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 01, 2026 9:29 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'फक्त अजितदादांचा तेरावा होऊन जाऊ द्या, मग मी सगळं सांगतो', रोहित पवार स्पष्टच म्हणाले









