IND vs PAK : शून्यावर आऊट होऊनही मुंबईचा आयुष म्हात्रे मॅचविनर,भारताने पाकिस्तानला आणखी एका वर्ल्डकमध्ये धुतलं
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
खरं तर हा सामना भारताने 34 ओव्हरलाच भारताने जिंकला होता, पण औपचारीकता म्हणून पूर्ण सामना खेळवला ज्यात भारताने विजय मिळवत सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. तर पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर झाला आहे.
India vs Pakistan : आयसीसी अंडर 19 च्या वर्ल्ड कप सामन्यात भारताने दिलेल्या 252 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान 194 धावांवर ऑलआऊट झाला होता.त्यामुळे भारताने हा सामना 58 धावांनी जिंकला आहे.या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार आयुश म्हात्रे शुन्यावर बाद झाला असला तरी त्याने गोलंदाजीत कमाल करून दाखवत भारताचा सामना जिंकून दिला आहे. खरं तर हा सामना भारताने 34 ओव्हरलाच भारताने जिंकला होता, पण औपचारीकता म्हणून पूर्ण सामना खेळवला ज्यात भारताने विजय मिळवत सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. तर पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर झाला आहे.
भारताने पाकिस्तानसमोर 252 धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्यामुळे सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तानला हे लक्ष्य 50 ओव्हर ऐवजी 33.3 ओव्हरमध्ये गाठणे आवश्यक होते.पाकिस्तान 34 ओव्हरपर्यंत फक्त 167 धावा करू शकल्याने भारताने सेमी फायनल गाठली होती आणि पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर झाला होता.
भारताने दिलेल्या 252 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सूरूवात चांगली झाली नव्हती. कारण सलामीवर समीर मिन्हास 9 धावांवर बाद झाला होता.त्यानंतर हमझा जहूर आणि उस्मान खानने पाकिस्तानचा डाव सावरला होता. पण हमजा जहूर अर्धशतक ठोकण्याआधीच 42 धावांवर बाद झाला होता. त्यानंतर उस्मान खान 66 धावांवर बाद झाला. दोघेही चांगल्या लयीत असलेल्या खेळाडू बाद झाल्याने पाकिस्तानचा डाव गडगडला.
advertisement
कर्णधार हरफान योसोफने 38 धावांची खेळी केली.त्यानंतर सगळे खेळाडू एकेरी धावा करून बाद झाले आहेत.आणि 46.2 ओव्हरमध्ये पाकिस्तानचा डाव 194 धावांवर ऑल आऊट झाला.त्यामुळे भारताने हा सामना 58 धावांनी जिंकून सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. भारताच्या विजयाचा शिल्पकार आयुष म्हात्रे ठरला आहे कारण त्याने 3 विकेट काढल्या आहेत.
भारताकडून आयुश म्हात्रे आणि खिलान पटेलने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या आहेत.कनिष्क चौहान, विहान मल्होत्रा,आर अम्बरीश, आणि हेनिल पटेलने प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.
advertisement
भारताचा डाव
टीम इंडिया प्रथम फलंदाजीला उतरली होती. टीम इंडियाकडून आरोन जॉर्ज आणि वैभव सूर्यवंशी मैदानात उतरले होते. पण दोन्ही खेळाडूंना मोठ्या धावा करता आल्या नाही. वैभव सूर्यवंशी 30 धावांवर बाद झाला.त्याच्या पाठोपाठ कर्णधार आयुश म्हात्रे शुन्यावर बाद झाला,त्यानंतर लगेचच ऑरोन जॉर्ज 16 वर बाद झाला. भारताच्या या तीनही विकेट 47वर पडल्या होत्या.
advertisement
टीम इंडियाचे हे तीन खेळाडू बाद झाल्यानंतर 18 वर्षांचा वेदांत त्रिवेदी मैदानात आला, यावेळी त्याच्यासोबत विहान मल्होत्रा मैदानात होता. यावेळ वेदांतने संयमीपणे मैदानात टीचून खेळायला सूरूवात केली.या दरम्यान दुसऱ्या बाजूने भारताच्या विकेट पडतच होत्या. विहान मल्होत्रा 21 तर अभिग्यान कुंडू 16 धावांवर बाद झाला होता.त्यानंतर वेदांत त्रिवेदीने एकट्याने पाकिस्तानशी भिडून 68 धावांची खेळी केली. जिकडे सगळेच खळाडू फेल ठरत होते तिकडे वेदांतने अर्धशतकीय खेळी केली.या खेळीच्या बळावर भारत 200 च्या आसपास पोहोचला होता.
advertisement
त्यानंतर शेवटच्या क्षणी आर अम्बरीशने 29, खिलान पटेलने 21 धावा आणि कनिश्क चौहाने 35 धावांची खेळी केली.या खेळीच्या बळावर भारत 252 धावांवर ऑल आऊट झाली होती.पाकिस्तानकडून अब्दुल सुभानने प्रत्येकी 3,मोहम्मद सय्यामने 2 आणि अली राजा,अहमद हुसने, मोमीन कमार आणि अली हसन बलोचने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 01, 2026 9:06 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : शून्यावर आऊट होऊनही मुंबईचा आयुष म्हात्रे मॅचविनर,भारताने पाकिस्तानला आणखी एका वर्ल्डकमध्ये धुतलं









