Nakuul Mehta: "आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहे जिथे...", 43 व्या वर्षीच प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्याची बॉलिवूडमधून निवृत्ती?
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
'स्पेस जेन: चांद्रयान' या वेबसीरिजमुळे अभिनेता नकुल मेहता सध्या चर्चेत आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात आलेला नकुल सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर निवडक कामांना प्राधान्य देत आहे. जवळजवळ दोन दशकांपासून अभिनय क्षेत्रात सक्रिय असलेला नकुल आता सतत काम न करण्याचा विचार तो सध्या करत आहे. हा विचार त्याने अलीकडेच एका मुलाखतीतून सांगितला आहे.
advertisement
जवळजवळ दोन दशकांपासून अभिनय क्षेत्रात सक्रिय असलेला नकुल आता सतत काम न करण्याचा विचार तो सध्या करत आहे. हा विचार त्याने अलीकडेच एका मुलाखतीतून सांगितला आहे. तो म्हणतो, "आपल्या फिल्मी करियरच्या सुरूवातीच्या काळात आपण सतत काम करत राहणे महत्त्वाचे असते, कारण त्यावेळी तुमच्याकडे अनुभव कमी असतो आणि तुम्ही कोणत्याही कामासाठी कायमच एनर्जिटिक असतात."
advertisement
advertisement
नकुल म्हणतो, "मी माझ्या कारकिर्दीची सुरुवात 'प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा' या टीव्ही मालिकेने केली होती. ती मालिका जवळजवळ तीन वर्षे चालली होती. दररोज शुटिंगला जाऊन मी खूप काही शिकलो. यामुळे माझ्या अभिनयात आराम आणि परिपक्वतेची भावना निर्माण झाली. आता, मी माझ्या आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहे जिथे माझे कुटुंब आणि दोन मुले आहेत. "
advertisement
नकुल पुढे म्हणाला की, "मी माझे काम अधिक काळजीपूर्वक निवडतो. काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात संतुलन राखणे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. जर मी कामासाठी माझ्या कुटुंबापासून दूर राहणार असेल तर कायमच कामाला महत्त्व दिले पाहिजे. मला आता दररोज काम करावे लागत नाही. मी आयुष्यात हा छोटासा विशेषाधिकार मिळवला आहे. मला थोडे आर्थिक स्वातंत्र्य हवे आहे."
advertisement
advertisement
"पण, आता, इंडस्ट्रीमध्ये इतकी वर्षे काम केल्यानंतर, मी त्या भीतीला कृतीत उतरवायला शिकलो आहे. अपयशाच्या शक्यतेवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, मी असा विचार करण्याचा प्रयत्न करतो की जर मी काम प्रामाणिकपणे आणि सचोटीने केले तर ते लोकांपर्यंत पोहोचेल. जर ते झाले तर त्याला प्रेम मिळेल. ते प्रेम फक्त माझ्या कामातून नाही तर माझ्या प्रोजेक्टवर काम करणाऱ्या प्रत्येकाकडून येते." अशी अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली.








