बॉर्डरवर पाकिस्तानला फुटला घाम, भारताने दिले धक्कादायक संकेत; चीन देखील अस्वस्थ, एका निर्णयाने बांगलादेशचा माज उतरवला
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Neighbourhood First policy: परराष्ट्र मंत्रालयाच्या बजेटमध्ये वाढ करत भारताने ‘नेबर फर्स्ट’ धोरणाला नवी धार दिली आहे. अफगानिस्तान, नेपाळ, भूतान आणि श्रीलंकेसाठी मदत वाढवून, तर बांगलादेश व मालदीवसाठी निधी कमी करून भारताची बदलती प्रादेशिक रणनीती स्पष्ट झाली आहे.
नवी दिल्ली: केंद्र सरकारने आगामी आर्थिक वर्षासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या (Ministry of External Affairs – MEA) बजेटमध्ये सुमारे 1,600 कोटी रुपयांची वाढ करत एकूण 22,119 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या बजेटमधून भारताच्या परराष्ट्र धोरणाचे स्पष्ट संकेत मिळतात. विशेषतः ‘नेबर फर्स्ट’ धोरण आणि प्रादेशिक संतुलन यांना प्राधान्य देण्याची भारताची भूमिका या अर्थसंकल्पातून ठळकपणे समोर आली आहे.
या बजेट वाटपावरून असे स्पष्ट होते की, ज्या देशांशी संबंध तणावपूर्ण किंवा मर्यादित झाले आहेत, त्या देशांसाठीचा निधी कमी करण्यात आला आहे; तर ज्या देशांशी भारताचे धोरणात्मक, मानवी आणि विकासात्मक संबंध मजबूत आहेत, त्यांच्यासाठी मदत वाढवण्यात आली आहे. बांगलादेश आणि मालदीवसाठी निधी कमी, तर अफगानिस्तान, नेपाळ, भूतान आणि श्रीलंका यांच्यासाठी आर्थिक मदत वाढवून भारताने नवी रणनीतिक दिशा निश्चित केली आहे.
advertisement
पक्क्या मित्रासाठी खजिना खुला
अफगानिस्तानसाठी भारताने आपला निधी 50 कोटी रुपयांनी वाढवून एकूण 150 कोटी रुपये केला आहे. प्रादेशिक कूटनीतीच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. धोरणात्मक तज्ज्ञांच्या मते, अफगानिस्तानात भारताकडून सुरू असलेली मानवी मदत आणि विकास प्रकल्प पाकिस्तानसाठी अस्वस्थता निर्माण करणारी बाब आहे.
काबूलमध्ये भारताची उपस्थिती वाढल्यास पाकिस्तानची पारंपरिक रणनीती आणि त्याचा प्रादेशिक प्रभाव कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अफगानिस्तानसाठी वाढवलेली ही आर्थिक मदत केवळ मानवी दृष्टिकोनातूनच नव्हे, तर भू-राजकीय समीकरणांमध्येही महत्त्वाची ठरणार आहे.
advertisement
बांगलादेशला ‘कर्मांची फळे’?
दुसरीकडे बांगलादेशशी संबंधित बाबींसाठीचा निधी घटवून 60 कोटी रुपये करण्यात आला आहे. गेल्या वर्षी मंजूर करण्यात आलेल्या 120 कोटी रुपयांचा संपूर्ण वापर न झाल्यामुळे ही कपात करण्यात आली आहे. यामधून स्पष्ट संकेत मिळतात की, ढाकासोबतचे सहकार्य आता मर्यादित चौकटीत ठेवले जाणार आहे.
मालदीवसाठीही कपात
भारताने मालदीवसाठीच्या निधीत 50 कोटी रुपयांची कपात करत एकूण 550 कोटी रुपये मंजूर केले आहेत. गेल्या काही काळात भारत–मालदीव संबंधांमध्ये निर्माण झालेल्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
advertisement
नेपाळ–भूतानवर विशेष लक्ष; चीनसाठी वाढती ‘टेंशन’
या बजेटमधील सर्वात ठळक संदेश नेपाळ आणि भूतान या दोन देशांबाबत आहे. नेपाळसाठी भारताने निधी वाढवून 800 कोटी रुपये केला असून, हा आकडा मागील वर्षाच्या तुलनेत 100 कोटी रुपयांनी अधिक आहे. त्याचप्रमाणे भूतानसाठी भारताने तब्बल 2,288 कोटी रुपयांचे मोठे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. यामुळे भारत–भूतान विकास भागीदारी अधिक मजबूत होणार आहे.
advertisement
विशेष म्हणजे नेपाळ आणि भूतानमध्ये भारताने आपली आर्थिक मदत वाढवण्याचा निर्णय अशा वेळी घेतला आहे; जेव्हा चीन या देशांमध्ये गुंतवणूक आणि पायाभूत प्रकल्पांद्वारे आपली उपस्थिती वाढवण्याचा प्रयत्न करत होता. भारताच्या या पावलामुळे चीनची रणनीतिक अस्वस्थता वाढण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
| देश | बजेट तरतूद (कोटी ₹) | बदल/परिणाम |
| भूतान | 2,288 कोटी | सर्वात मोठी मदत (चीनसाठी धोक्याची घंटा) |
| नेपाल | 800 कोटी | 100 कोटींची वाढ (ड्रॅगनला धक्का) |
| मालदीव | 550 कोटी | 50 कोटींची कपात (राजकीय तणावाचा परिणाम) |
| श्रीलंका | 400 कोटी | 100 कोटींची वाढ (आर्थिक स्थैर्यासाठी आधार) |
| अफगाणिस्तान | 150 कोटी | 50 कोटींची वाढ (पाकिस्तानसाठी डोकेदुखी) |
| बांगलादेश | 60 कोटी | मोठी कपात (सहकार्य मर्यादित केल्याचे संकेत) |
advertisement
श्रीलंकेलाही आधार
आर्थिक संकटातून सावरत असलेल्या श्रीलंकेसाठी भारताने निधी 100 कोटी रुपयांनी वाढवून एकूण 400 कोटी रुपये मंजूर केले आहेत. कोलंबोसाठी ही मदत आर्थिक स्थैर्य आणि पुनर्बांधणीच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 01, 2026 10:11 PM IST
मराठी बातम्या/देश/
बॉर्डरवर पाकिस्तानला फुटला घाम, भारताने दिले धक्कादायक संकेत; चीन देखील अस्वस्थ, एका निर्णयाने बांगलादेशचा माज उतरवला









