पाकिस्तानमध्ये 200 नागरीकांचा मृ्त्यू, 40 तासांपासून धुमश्चक्री,बॉम्ब,रॉकेट हल्ल्यांनी शहर हादरली
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
पाकिस्तान बलुचिस्तानमध्ये सध्या संघर्ष पेटला आहे. बलुचिस्तान 10 जिल्ह्यांवर हल्ले केल्यानंतर आक्रामक झालेल्या पाकिस्तान प्रतिहल्ला चढवला होता.त्यामुळे तब्बल 40 तास या दोघांमध्ये गृह युद्ध सूरू होते. या युद्धात आता 200 पाकिस्तानी नागरीकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
Pakistan News : पाकिस्तान बलुचिस्तानमध्ये सध्या संघर्ष पेटला आहे. बलुचिस्तान 10 जिल्ह्यांवर हल्ले केल्यानंतर आक्रामक झालेल्या पाकिस्तान प्रतिहल्ला चढवला होता.त्यामुळे तब्बल 40 तास या दोघांमध्ये गृह युद्ध सूरू होते. या युद्धात आता 200 पाकिस्तानी नागरीकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 31 नागरिक, 17 सुरक्षा कर्मचारी आणि 145 बीएलए सैनिकांचा समावेश होता. या घटनेने पाकिस्तानमध्ये खळबळ मांडली आहे.
खरं तर बलुचिस्तान दहशतवाद्यांकडून पाकिस्तानच्या क्वेटा, ग्वादर, मुस्तुंग आणि नोशकीसह अनेक जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी हल्ले केले होते. बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली. ज्यामुळे लष्कर, पोलिस आणि दहशतवादविरोधी पथकांनी मोठी कारवाई केली.
बलुचिस्तानच्या या हल्यानंतर पाकिस्तानने त्यांच्यावर 40 तास हल्ला करून त्यांना प्रत्युत्तर दिले होते. यामध्ये 31 नागरिक, 17 सुरक्षा कर्मचारी आणि 145 बीएलए सैनिकांचा समावेश होता. इतकेच नाही तर पाकिस्तानी लष्कराच्या मते, शनिवारीच 100 हून अधिक लोक मारले गेल्याची माहिती आहे.त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी राजधानी क्वेटा येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, या मृतांच्या संख्येत शुक्रवार आणि शनिवारी छापे तसेच कोम्बिंग ऑपरेशनमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांचा समावेश आहे. दहशतवादा विरुद्धच्या युद्धात पाकिस्तानने आतापर्यंत सामना केलेला हा सर्वात मोठा आकडा आहे.
बीएलएने शनिवारी सांगितले की त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना लक्ष्य करून "ऑपरेशन हारोफ" चा दुसरा टप्पा सुरू केला आहे. लष्कराने दोन वेगवेगळ्या कारवाईत ४१ बंडखोरांना ठार मारल्याचा दावा केल्यानंतर एका दिवसात ही घोषणा करण्यात आली.
advertisement
या गटाचे प्रवक्ते जियांद बलोच यांच्या नावाने जारी केलेल्या निवेदनात असा दावा करण्यात आला आहे की त्यांच्या सैनिकांनी नोश्की येथील काउंटर टेररिझम डिपार्टमेंट (सीटीडी) मुख्यालय ताब्यात घेतले आणि फ्रंटियर कॉर्प्स युनिट उद्ध्वस्त केले, ज्यामध्ये पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला. इतरत्र, बंडखोरांनी जिल्हा तुरुंगातून किमान 30 कैद्यांना मुक्त केले आणि शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला.
advertisement
सुरक्षा दलांनी रविवारी प्रभावित भागात शोध मोहीम सुरू ठेवली. जवळजवळ एक डझन ठिकाणे सील करण्यात आली आहेत. संपूर्ण प्रांतात 24 तासांहून अधिक काळ मोबाइल इंटरनेट सेवा निलंबित करण्यात आली आहे. रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आणि रेल्वे सेवा निलंबित करण्यात आल्या. मुख्य रस्ते आणि बाजारपेठा बंद होत्या आणि लोक भीतीच्या वातावरणात घरातच होते.
advertisement
भारताचे पाकिस्तानला प्रत्युत्तर
दरम्यान एक दिवस आधी, पाकिस्तानी लष्कराने कोणताही पुरावा न देता हे हल्ले भारत पुरस्कृत असल्याचा आरोप केला होता. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी या दाव्याचा पुनरुच्चार केला आणि हल्लेखोरांचे भारताशी संबंध असल्याचा आरोप केला आहे.
भारताने पाकिस्तानचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एका कडक निवेदनात म्हटले आहे की हे दावे केवळ पाकिस्तानच्या अंतर्गत अपयशांवरून लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तानची जुनी युक्ती आहे.प्रत्येक हिंसक घटनेनंतर निराधार आरोप पुन्हा करण्याऐवजी, पाकिस्तानने या प्रदेशातील आपल्या लोकांच्या दीर्घकालीन मागण्यांकडे लक्ष केंद्रित करावे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 01, 2026 11:19 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
पाकिस्तानमध्ये 200 नागरीकांचा मृ्त्यू, 40 तासांपासून धुमश्चक्री,बॉम्ब,रॉकेट हल्ल्यांनी शहर हादरली








