WPL 2026 : मुंबई इंडियन्सचं फायनलचं स्वप्न भंगलं, दिल्लीच्या विजयाने हरमनप्रीत कौरची टीम स्पर्धेबाहेर
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
WPL 2026 : वुमेन्स प्रिमियर लीगच्या शेवटच्या लीग सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 5 विकेट राखून युपी वॉरियर्सचा पराभव केला आहे. युपीयच्या या पराभवामुळे मुंबई इंडियन्सच फायनल जिंकण्याच स्वप्न भंगलं आहे.
WPL 2026 : वुमेन्स प्रिमियर लीगच्या शेवटच्या लीग सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 5 विकेट राखून युपी वॉरियर्सचा पराभव केला आहे. युपीयच्या या पराभवामुळे मुंबई इंडियन्सच फायनल जिंकण्याच स्वप्न भंगलं आहे.खरं तर दिल्ली कॅपिटल विरूद्ध युपी वॉरियर्सच्या सामन्याच्या निकालावर मुंबई इंडियन्सच भवितव्य अवलंबून होतं. पण या सामन्यात युपी वॉरियर्सने दिल्ली विरूद्ध सामना हरल्याने मुंबई आणि युपी हे दोन्ही संघ बाहेर झाले आहे. आणि दिल्ली कॅपिटल्सने प्लेऑफमध्ये एंन्ट्री मारली आहे.
खरं युपी वॉरियर्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर 123 धावांचे लक्ष्य ठेवले होते.या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली होती. दिल्लीकडून लिझेली 10 धावांवर स्वस्तात बाद झाली होती.त्यानंतर शेफाली वर्मा आणि लोरा वोव्हार्टने दिल्लीचा डाव सावरला होता. त्यानंतर लोरा वोव्हार्ट अर्धशतकाच्या जवळ असताना 47 धावांवर बाद झाली होती.यानंतर कर्णधार जेमीमा रॉड्रीग्ज मैदानात आली होती.
advertisement
जेमीमा मैदानात उतरताच एकामागून एक विकेट पडली होती. यानंतर जेमिमाने एका बाजूने डाव सावरून 34 धावांची नाबाद खेळी करून हा सामना 5 विकेट राखून जिंकला आहे.
युपी वॉरियर्स 20 ओव्हरमध्ये फक्त 122 धावा करू शकली होती. युपीकडून दिप्ती शर्माने सर्वाधिक 24 धावा केल्या होत्या.तिच्यासोबत शिखा पांडेने 23 धावांची नाबाद खेळी केली होती.या खेळीच्या बळावर त्यांनी 122 धावा केल्या होत्या. तर दिल्लीकडून मेरीजन कापने 3,चिनेली हेन्री आणि श्री चरणीने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या होत्या. आणि मिनू मानीने 1 विकेट घेतली होती.
advertisement
दरम्यान हा सामना मुंबई इंडियन्सच्या दृष्टीने खूप महत्वाचा होता. कारण मागच्या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या संघाचा निसटता पराभव झाला होता.त्यामुळे मुंबई इंडियन्सच प्लेऑफचं भवितव्य दिल्ली कॅपिटल्स आणि युपी वॉरियरर्सच्या हातात होतं. पण या सामन्यात दिल्लीने युपीचा पराभव झाल्याने मुंबई स्पर्धेतून बाहेर झाली आहे.
दिल्लीने हा सामना जिंकून प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे.आता एलिमिनेटरमध्ये दिल्लीचा सामना गुजरात जाएटसशी होणार आहेत.या सामन्यातील विजेता संघ हा रॉयल चँलेजर्स बंगळुरूसोबत डब्ल्युपीएलच्या फायनलमध्ये भिडणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 01, 2026 10:49 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
WPL 2026 : मुंबई इंडियन्सचं फायनलचं स्वप्न भंगलं, दिल्लीच्या विजयाने हरमनप्रीत कौरची टीम स्पर्धेबाहेर









