TRENDING:

Farmers Success Story: शेतकऱ्याने केली चिकनपेक्षा महाग विकणाऱ्या रानभाजीची शेती, 20 गुठ्यांत 250000 रुपयांचे निव्वळ उत्पन्न, Video

Last Updated:

Farmers Success Story: शेतीमध्येही आता नवनवीन प्रयोग होऊ लागले आहेत. नवीन तरुण शेतीमध्ये आधुनिक प्रयोग करून ती उत्पन्न देणारी ठरवत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना: शेतीमध्येही आता नवनवीन प्रयोग होऊ लागले आहेत. नवीन तरुण शेतीमध्ये आधुनिक प्रयोग करून ती उत्पन्न देणारी ठरवत आहेत. जिल्ह्यातील वखारी वडगाव येथील गणेश खैरे या शेतकऱ्याने कंटुले या रानभाजीची शेती यशस्वी करून दाखवली आहे. पाहुयात मागील सात वर्षांपासून खैरे कशा पद्धतीने करतात या शेतीचे नियोजन.
advertisement

जालना शहरापासून 20 किमी अंतरावर असलेल्या मखारी या गावांमध्ये गणेश खैरे यांची शेती आहेमागील 7 वर्षांपासून ते कंटुल्याची शेती करतात. चिखली दाभाडी येथून त्यांनी 5 हजार रुपये प्रति किलो या दराने पहिल्यांदा बियाणे विकत आणले. आपल्या 10 गुंठे शेतामध्ये त्याची लागवड केली. कंटुले विक्रीतून 50 हजार तर बीज विक्रीतून 50 हजार असा तब्बल 1 लाखांचा नफा त्यांना पहिल्याच वर्षी झाला.

advertisement

Green Chilli Prices: हिरवी मिरची महागली, शेतकऱ्यांसाठी आले चांगले दिवस, किलोला मिळतोय एवढा दर, Video

पुढे त्यांनी हे क्षेत्र अर्ध्या एकर पर्यंत वाढवलेआता त्यांना दरवर्षी दीड ते 2 लाखांचा नफा कंटुले विक्रीतून तर 1 ते सव्वा लाखाचे उत्पन्न त्याच्या बीज विक्रीतून होत आहे. एक शेतकरी 5 हजार रुपये प्रति किलो या दराने कंटुल्याचे बी शेतात लावण्यासाठी या शेतकऱ्याकडून घेऊन जात आहेत.

advertisement

तर बाजारामध्ये या भाजीला तीनशे ते चारशे रुपये प्रति किलो एवढा प्रचंड दर मिळत आहे. चिकन पेक्षा ही महाग विक्री होत असल्याने आणि पोषक तत्त्वांनी भरपूर असल्याने शेतकरी कंटुलेची शेती केल्याने आर्थिक दृष्ट्या समृद्ध होऊ शकतात, अशी भावना शेतकरी गणेश खैरे यांनी लोकल 18 शी बोलताना व्यक्त केली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बाजरीची भाकरी नेहमीच खाता; थंडीत नक्की ट्राय करा हा पौष्टिक पदार्थ, सोपी रेसिपी
सर्व पहा

पारंपारिक पिकांना फाटा देऊन शेतकऱ्यांनी नवनवीन पद्धतीची शेती करावी आणि आपली भरभराट करावी, असं आवाहन देखील नवीन तरुणांना त्यांनी केले आहे.

मराठी बातम्या/कृषी/
Farmers Success Story: शेतकऱ्याने केली चिकनपेक्षा महाग विकणाऱ्या रानभाजीची शेती, 20 गुठ्यांत 250000 रुपयांचे निव्वळ उत्पन्न, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल