TRENDING:

बाजरीची भाकरी नेहमीच खाता; पण थंडीत नक्की ट्राय करा हा पौष्टिक पदार्थ, पाहा सोपी रेसिपी, Video

Last Updated:

Bajra Recipe: बाजरीचे घावन तुम्ही अगदी मोजक्या आणि घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यात बनवू शकता. रेसिपी पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : महाराष्ट्रभरात कडाक्याची थंडी जाणवत आहे. या थंडीत शरीराला उष्णता देणारे आणि ऊर्जा मिळवून देणारे पदार्थ खाणे आवश्यक असते. बाजरी, तीळ आणि गूळ यापासून बनवलेले पदार्थ थंडीच्या दिवसांत विशेष फायदेशीर ठरतात. बाजरीपासून बनवलेली भाकरी नेहमीच खाल्ली जाते. मात्र रोज-रोज भाकरी खाण्याचा अनेकांना कंटाळा येतो. त्यामुळे आज आपण बाजरीपासून झटपट तयार होणारा आणि चविष्ट असा पदार्थ पाहणार आहोत. तो म्हणजे बाजरीचे घावन. पुण्यातील गृहिणी वसुंधरा पाटुकले यांनी ही रेसिपी सांगितली आहे.
advertisement

घावन बनवण्यासाठी साहित्य

बाजरीचे घावन तुम्ही अगदी मोजक्या आणि घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यात बनवू शकता. यामध्ये तुम्हाला जेवढी घावन बनवायची आहेत त्यानुसार बाजरीचे पीठ, बेसन, मीठ आणि भाजण्यासाठी तेल घ्यावे.

Popti Recipe: थर्टी फर्स्टला घरीच बनवा मडक्यामध्ये गावरान पोपटी, रेसिपी खास Video

बाजरीचे घावन बनवण्याची कृती

बाजरीचे घावन बनवण्यासाठी सुरुवातीला एका मोठ्या बाउलमध्ये एक बाउल बाजरीचे पीठ आणि अर्धा बाउल बेसन नीट मिसळावे. त्यात चवीनुसार मीठ आणि सोडा घालून हळूहळू पाणी टाकून गुळगुळीत आणि जाडसर बॅटर तयार करावे. बॅटर तयार झाल्यानंतर त्याला 10 मिनिटे मुरण्यासाठी ठेवावे.

advertisement

आपला तवा किंवा पॅन चांगला गरम करून त्यावर एक टेबलस्पून तेल पसरवावे. मोठ्या आचेवर पळीने बॅटर घालून घावन तयार करावा. दोन-तीन मिनिटांनी बाजूने थोडे तेल टाकून घावन पॅनमधून सोडवून घ्या आणि नंतर पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील सोनेरी भाजा. तयार घावन बटाट्याची भाजी आणि चटणीसह खाण्यासाठी तयार आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बाजरीची भाकरी नेहमीच खाता; थंडीत नक्की ट्राय करा हा पौष्टिक पदार्थ, सोपी रेसिपी
सर्व पहा

दरम्यान, तुम्ही देखील अगदी सोपी आणि पौष्टिक रेसिपी घरीच बनवू शकता. थंडीच्या दिवसांत हे घावन आरोग्यासाठी देखील लाभदायी ठरते.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
बाजरीची भाकरी नेहमीच खाता; पण थंडीत नक्की ट्राय करा हा पौष्टिक पदार्थ, पाहा सोपी रेसिपी, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल