Popti Recipe: थर्टी फर्स्टला घरीच बनवा मडक्यामध्ये गावरान पोपटी, रेसिपी खास Video

Last Updated:

नाताळची सुट्टी आणि पोपटीचा आस्वाद घेण्यासाठी लोक शहराकडून गावाकडे जात असतात. गावाकडची नॉनव्हेज पोपटी म्हणजे एक पारंपरिक आणि चविष्ट डिश आहे.

+
गावरान

गावरान पोपटी 

थंडी सुरू झाली की पोपटी बनवायला उधाण येतो. नाताळची सुट्टी आणि पोपटीचा आस्वाद घेण्यासाठी लोक शहराकडून गावाकडे जात असतात. गावाकडची नॉनव्हेज पोपटी म्हणजे एक पारंपरिक आणि चविष्ट डिश आहे, ज्यात चिकन, अंडी, वाटाणे, बटाटी आदी भाज्या घेऊन पोपटी करतात. पोपटी करण्यासाठी कुटुंब मित्र परिवार एकत्र येऊन ही पोपटी शेतात किंवा माळावर करतात.
पोपटी बनवण्याची पारंपरिक पद्धत (Non-Veg Popti)
साहित्य-
मांसाहार: चिकन किंवा मटण.
भाज्या: वालाच्या शेंगा (घेवडा), बटाटे, कांदा.
अंडी: अख्खी अंडी किंवा अंड्यांचे काप.
पाने: भांबुर्ड्याची /केळीची पाने (यामुळे खास वास येते).
मसाला: कोथिंबीर, पुदिना, आलं, लसूण, मिरची, हळद, लिंबू, मीठ,
इतर: ओवा (घट्टपणासाठी).
कृती-
मसाला तयार करणे: कोथिंबीर, पुदिना, आलं, लसूण, मिरची, हळद, मीठ, लिंबू, दही यांची पेस्ट बनवा. यात चिकन/मटण मॅरीनेट करा.
advertisement
थर लावणे: मातीच्या मडक्याला किंवा मोठ्या पत्र्याच्या डब्याला भांबुर्ड्याची पाने लावून घ्या.
भरणे: पानांवर मसाल्यात घोळलेले चिकन/मटण, शेंगा, बटाटे, कांदा आणि अंडी यांचे थर द्या.
बंद करणे: वरून अजून पाने आणि थोडे मिश्रण घालून घट्ट बंद करा, जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही.
शिजवणे: हे मडकं किंवा डबा कोळशाच्या शेगडीवर किंवा मंद आचेवर गॅसवर ठेवून शिजवा, जेणेकरून सर्व चवी आत मुरतील.
advertisement
खाणे: ही पोपटी थेट मडक्यात किंवा डब्यातून गरमागरम खाल्ली जाते.
मित्र-मैत्रिणी किंवा सर्व कुटुंब एकत्र येऊन गावाकडचा स्टार्टर मेनू म्हणून आनंदात खातात.तुम्ही ही पोपटी थर्टी फर्स्ट ला सर्वजण एकत्र येऊन नक्कीच बनू शकता
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Popti Recipe: थर्टी फर्स्टला घरीच बनवा मडक्यामध्ये गावरान पोपटी, रेसिपी खास Video
Next Article
advertisement
BMC Election : दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
  • शिवसेना ठाकरे गटात आणि शिंदे गटात काही जागांवर थेट लढत असणार आहे.

  • ठाकरेंना बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी शिंदे गटाकडून आक्रमक डाव खेळला जात आहे.

  • ठाकरेंचा गेम करण्यासाठी शिंदे गटाने खेळी खेळली पण, त्यातच ते फसले आहेत.

View All
advertisement