Weekly Horoscope: एकनाथ षष्ठीपासून सुरू होणारा आठवडा कोणासाठी लकी; मेष ते मीन साप्ताहिक राशीफळ
- Written by:Chirag Daruwalla
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Weekly Horoscope Marathi: मार्च महिन्याच्या या आठवड्यात बहुतेक राशींसाठी संमिश्र पण प्रगतीकडे नेणारे निकाल पाहायला मिळतील. मेष, वृषभ, तूळ, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ खास आणि भाग्याचा असणार आहे. तुमची रखडलेली कामं पूर्ण होतील, करिअर आणि व्यवसायात प्रगतीचे मार्ग उघडतील आणि वरिष्ठांची चांगली साथ मिळेल. पैशांचा फायदा आणि नवीन जबाबदाऱ्यांमुळे समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. घरगुती आयुष्य आनंदी राहील, जुने गैरसमज मिटतील आणि प्रेमसंबंधांमध्ये अजून गोडवा येईल. प्रवासातून फायदा होईल आणि गुंतवणुकीतून चांगलं फळ मिळण्याची शक्यता आहे. तुमची मेहनत आणि योग्य निर्णय भविष्यासाठी एक भक्कम पाया रचतील. दुसरीकडे मिथुन, कर्क, सिंह, कन्या, वृश्चिक, धनु आणि मीन राशीच्या लोकांनी या आठवड्यात जरा जपून पावलं टाकण्याची गरज आहे. ज्योतिषी चिराग दारुवाला यांनी सांगितलेले सविस्तर साप्ताहिक राशीफळ जाणून घेऊ.
मेष - हा आठवडा मेष राशीसाठी शुभ संकेत आणि नशीब घेऊन आला आहे. गेल्या आठवड्यात तुमच्या प्रयत्नांच्या आड येणारे अडथळे आता दूर होतील. आठवड्याच्या पहिल्या भागात कुटुंबात जे काही गैरसमज झाले होते ते मिटतील आणि त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. तरुण मंडळी या आठवड्यात खूप मजा-मस्ती करतील. आठवड्याचा दुसरा भाग करिअर आणि बिझनेसच्या दृष्टीने लय भारी असेल. नोकरी करणाऱ्यांवर वरिष्ठ खुश राहतील आणि तुमच्या कामाचं कौतुक होईल. मेहनतीचं पूर्ण फळ तुम्हाला मिळेल. तुमचं पद आणि प्रतिष्ठा वाढू शकते. या काळात तुम्ही तुमच्या बुद्धीने मोठ्या समस्या सहज सोडवू शकाल. व्यवसायासाठी केलेले प्रवास लय फायदेशीर ठरतील. मित्र आणि परिवाराच्या मदतीने बिझनेस वाढवण्याचे प्लॅन यशस्वी होतील. कोर्टाच्या कामात दिलासा मिळेल आणि तुमचे विरोधक स्वतःहून तडजोड करायला पुढे येतील. लव्ह लाईफ एकदम जबरदस्त असेल, जोडीदारासोबत रोमँटिक वेळ घालवायला मिळेल. अविवाहित लोकांना मनासारखा जोडीदार मिळू शकतो. वैवाहिक जीवन सुखाचं राहील.लकी कलर: निळा, लकी नंबर: 4
advertisement
हा आठवडा वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असेल. तुमची ठरलेली कामं वेळेवर पूर्ण होतील. ज्या कामातून तुम्हाला गेले काही दिवस यश आणि नफा मिळतोय, त्यात या आठवड्यात अजून प्रगती दिसेल. टेक्नॉलॉजी क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. करिअर, बिझनेस आणि आर्थिक बाजूने हा काळ लय फायदेशीर आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग समोर येतील आणि दिलेले पैसे परत मिळतील. एकूणच पैशांच्या बाबतीत हा आठवडा लय लकी असेल. नोकरीत परिस्थिती तुमच्या बाजूने राहील आणि वरिष्ठ एखादी मोठी जबाबदारी तुमच्यावर सोपवू शकतात, ज्यामुळे तुमचं नाव होईल. तुमचे सहकारी सुद्धा तुम्हाला चांगली मदत करतील. कुटुंबासोबत लांबचा प्रवास घडण्याची शक्यता आहे, जो लय आनंददायी असेल. जर तुम्ही परीक्षेची किंवा स्पर्धेची तयारी करत असाल, तर या आठवड्यात एखादी चांगली बातमी मिळू शकते. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास वाढेल आणि जवळीक निर्माण होईल. नवरा-बायकोच्या नात्यात गोडवा राहील. घरच्या स्त्रियांचा कल धार्मिक कामांकडे जास्त असेल. आरोग्याच्या बाबतीत मात्र आठवड्याच्या उत्तरार्धात बदलत्या हवामानामुळे सावध राहा.लकी कलर: हिरवा, लकी नंबर: 1
advertisement
मिथुन राशीसाठी हा आठवडा संमिश्र असेल. सुरुवातीला कामाच्या प्रचंड व्यापामुळे मन थोडं अस्वस्थ राहू शकतं. या काळात तुम्हाला वेळ, ऊर्जा आणि पैसा या तिन्ही गोष्टींचं नियोजन नीट करावं लागेल, नाहीतर शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ शकतो. या आठवड्यात तुमची ओढ चैनीच्या वस्तूंवर खर्च करण्याकडे आणि दिखाव्याकडे जास्त राहील. विनाकारण खर्च टाळा, नाहीतर कोणाकडून तरी पैसे उसने घेण्याची वेळ येईल. व्यवसायात मंदीचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे नवीन करार करताना लय सावध राहा. नोकरी करणाऱ्यांनी ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी वाद घालणं टाळावं आणि आपल्या कामावर लक्ष द्यावं. जमिनीच्या किंवा मालमत्तेच्या वादांमुळे आठवड्याच्या दुसऱ्या भागात त्रास होऊ शकतो. इथे अहंकार मध्ये न आणता प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. नात्यांमध्ये चढ-उतार पाहायला मिळतील. तुम्ही काय बोलता आणि समोरच्याला काय समजतंय यात फरक असू शकतो, त्यामुळे विचारपूर्वक बोला. मुलांच्या समस्या काळजीत भर टाकू शकतात. लव्ह लाईफमध्ये सावध राहा आणि दिखावा टाळा, नाहीतर समाजात बदनामी होण्याची भीती आहे.लकी कलर: गुलाबी, लकी नंबर: 6
advertisement
कर्क राशीसाठी हा आठवडा संमिश्र निकालांचा असेल. आठवड्याच्या सुरुवातीला लांबच्या प्रवासाचे योग आहेत, अशा वेळी सामानाची आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. घाईघाईत कोणतंही काम करू नका आणि वाहन सावधपणे चालवा, कारण दुखापत होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला उत्पन्नात अडथळे आणि खर्च जास्त असल्यामुळे आर्थिक चणचण जाणवू शकते. शारीरिक आणि मानसिक त्रास सतावू शकतो, एखादा जुना आजार परत डोकं वर काढेल. कौटुंबिक प्रश्नांमुळे तुम्ही चिंतेत असाल. उत्तरार्धात जमिनीच्या वादासाठी कोर्टाची पायरी चढावी लागू शकते. कामात यश न मिळाल्यामुळे किंवा भावंडांशी पटत नसल्यामुळे तुम्हाला थोडं उदास वाटेल. नोकरीत विरोधकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. व्यवसायात रिस्क घेऊ नका आणि पैशांचे व्यवहार जपून करा. लव्ह लाईफ सुधारायची असेल तर जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. विवाहित लोकांना सासरच्या मंडळींकडून चांगली मदत आणि सहकार्य मिळेल.लकी नंबर: तपकिरी, लकी नंबर: 3
advertisement
या आठवड्यात सिंह राशीसाठी परिस्थिती कधी चांगली तर कधी कठीण अशी असेल. सुरुवातीला नशीब तुमच्या बाजूने असल्यामुळे कामं वेळेवर होतील, पण आठवड्याच्या दुसऱ्या भागात कामाशी संबंधित समस्या चिंता वाढवू शकतात. या आठवड्यात डोकं आणि मन दोन्ही ठिकाणावर ठेवून वागा. भावनेच्या भरात किंवा घाईघाईत करिअर किंवा बिझनेसचे निर्णय घेऊ नका, नाहीतर नंतर पश्चाताप होईल. काम पुढे ढकलण्याची सवय सोडा. आर्थिक बाबतीत हा आठवडा मध्यम राहील. सुरुवातीला खर्च जास्त असतील; चैनीच्या गोष्टींवर किंवा फिरण्यावर गरजेपेक्षा जास्त खर्च करू नका. उत्तरार्धात घरगुती प्रश्न सतावतील आणि वडिलोपार्जित मालमत्तेच्या कामात अडथळे येऊ शकतात. आरोग्याच्या बाबतीत हा काळ थोडा कठीण आहे. स्वतःच्या तब्येतीसोबतच आईच्या तब्येतीची सुद्धा काळजी घ्या. थोडा जरी त्रास वाटला तरी डॉक्टरकडे जायला उशीर करू नका. वैवाहिक सुख मध्यम राहील, नातं टिकवण्यासाठी प्रामाणिक राहा आणि जोडीदाराला समजून घ्या.लकी कलर: आकाशी, लकी नंबर: 1
advertisement
कन्या राशीसाठी हा आठवडा संमिश्र असेल. या आठवड्यात दुखापत होण्याची किंवा चोरी होण्याची भीती आहे, त्यामुळे वाहन चालवताना आणि सामानाची काळजी घ्या. सुरुवातीला तुम्ही धार्मिक आणि घरगुती कामात व्यस्त असाल. अचानक लांबचा प्रवास करावा लागू शकतो. आठवड्याच्या मध्यात एखाद्या शुभकार्याला किंवा सामाजिक कार्यक्रमाला जाण्याचे योग आहेत. अचानक मोठा खर्च सुद्धा करावा लागेल. कुटुंबाच्या बाबतीत हा बदलाचा काळ असेल. जर तुम्ही कोणाकडून मदतीची अपेक्षा करत असाल, तर तिथून तुमचा विश्वासघात होऊ शकतो. घरच्यांची साथ न मिळाल्यामुळे थोडं वाईट वाटेल, पण तुम्ही तुमच्या बुद्धीने या संकटातून बाहेर पडाल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवड्याचा उत्तरार्ध शुभ असेल. वरिष्ठांच्या मदतीने तुम्ही एखादं मोठं काम वेळेत पूर्ण कराल. तुमच्या विरोधकांचे प्लॅन फ्लॉप होतील आणि ऑफिसमध्ये तुमचं वर्चस्व वाढेल. लव्ह लाईफ छान राहील आणि जोडीदाराला अजून जवळून समजून घेण्याची संधी मिळेल.लकी कलर: गुलाबी, लकी नंबर: 4
advertisement
तूळ राशीचे लोक या आठवड्यात त्यांच्या ताकदीने, बुद्धीने आणि धैर्याने आपली स्वप्न पूर्ण करतील. हा आठवडा तुमच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरू शकतो. तुमच्यावर आनंदाचा आणि भाग्याचा वर्षाव होईल. गेले काही दिवस जे प्रश्न तुम्हाला सतावत होते, ते आता सहज सुटताना दिसतील. जुन्या गुंतवणुकीतून आणि बचतीतून फायदा व्हायला सुरुवात होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होतील. ऑफिसमध्ये सहकारी आणि वरिष्ठांची साथ मिळेल. बिझनेस करणाऱ्यांचे मार्केटमध्ये अडकलेले पैसे अचानक परत मिळतील. व्यवसायात नफा वाढेल आणि तुमचा उत्साह सुद्धा वाढलेला असेल. जोडीदारासोबत बिझनेस वाढवण्याचे प्लॅन कराल. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल. उत्तरार्धात सरकारकडून किंवा सत्ताधारी लोकांकडून मोठी मदत मिळण्याची शक्यता आहे. घरगुती प्रश्न सुटतील. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि जवळीक वाढेल, जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवाल. वैवाहिक जीवन सुखी राहील.लकी कलर: पिवळा, लकी नंबर: 4
advertisement
वृश्चिक राशीच्या लोकांनी या आठवड्यात छोट्या फायद्यासाठी मोठं नुकसान करून घेऊ नये. परिस्थिती सतत बदलत असल्यामुळे कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. सुरुवातीला नोकरीत थोडा दिलासा मिळेल, पण वेळ पूर्णपणे तुमच्या बाजूने नाहीय. वरिष्ठांशी संबंध चांगले ठेवा आणि विरोधकांपासून सावध राहा. आपलं काम दुसऱ्यावर सोपवू नका, नाहीतर नीट झालेलं काम सुद्धा बिघडू शकतं. उत्तरार्धात जुनं काम सोडून नवीन काहीतरी करण्याचा विचार कराल, पण असा निर्णय घेण्यापूर्वी हितचिंतकांचा सल्ला नक्की घ्या. पैशांच्या व्यवहारात चोख राहा, नाहीतर आर्थिक फटका बसू शकतो. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीची तब्येत चिंतेत भर टाकू शकते. घरगुती वादांमुळे मन अस्वस्थ राहील. नाती टिकवण्यासाठी बोलण्यावर ताबा ठेवा. लव्ह लाईफमध्ये काही गैरसमज असतील तर ते वादाऐवजी शांतपणे संवादातून सोडवा.लकी कलर: निळा, लकी नंबर: 3
advertisement
धनु राशीच्या लोकांनी या आठवड्यात कोणताही मोठा निर्णय घेताना किंवा नवीन काम सुरू करताना नीट विचार करावा, नाहीतर नंतर पश्चाताप होईल. जुन्या चिंता आणि समस्या अजून सुटताना दिसत नाहीत. नोकरीच्या शोधात असलेल्यांना अजून थोडी वाट पाहावी लागेल. झटपट पैसा कमवण्याचे शॉर्टकट टाळा. सुरुवातीला आर्थिक व्यवहारात सावध राहा, नाहीतर नुकसान होऊ शकतं. बिझनेसमध्ये मध्यम निकाल मिळतील, त्यामुळे कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. जर तुमचा बिझनेस भागीदारीत असेल, तर जोडीदारावर आंधळा विश्वास ठेवू नका. विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन लागणार नाही. नात्यांमध्ये संमिश्र अनुभव येतील. या आठवड्यात दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा, कारण मित्र किंवा भावंडांकडून अपेक्षित मदत मिळणार नाही. दिलेला शब्द पाळता येत नसेल तर वचन देऊ नका. लव्ह लाईफमध्ये सावध राहा. खाण्यापिण्याकडे लक्ष द्या, नाहीतर पोटाचे विकार त्रास देऊ शकतात.लकी कलर: निळा, लकी नंबर: 3
advertisement
मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नशीबवान असेल. सुरुवातीपासूनच तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रांत यश मिळेल. एखादी जुनी समस्या सुटल्यामुळे तुम्हाला मोठा दिलासा मिळेल. मित्र आणि परिवाराकडून चांगली मदत मिळेल. सरकारी कामात किंवा सत्ताधारी लोकांशी ओळख वाढेल. जमिनीचे व्यवहार बोलणी करून मार्गी लागतील. जर कोर्टात काही काम असेल, तर निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यात एखाद्या धार्मिक किंवा शुभकार्यात सहभागी व्हाल. अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत. व्यावसायिकांसाठी हा काळ नफ्याचा असेल. परदेशी व्यापारात मोठा फायदा होईल. नोकरीत सहकारी आणि वरिष्ठांची हवी ती साथ मिळेल. तुम्ही नियोजनाने काम कराल. नात्यांसाठी हा काळ चांगला आहे, तुमचं आकर्षण वाढेल. लव्ह लाईफमध्ये जवळीक वाढेल आणि वैवाहिक जीवन आनंदी राहील.लकी कलर: गुलाबी, लकी नंबर: 4
advertisement
कुंभ राशीसाठी हा आठवडा शुभ आणि भाग्याचा असेल. थोडे अडथळे आले तरी तुम्हाला हवं तसं यश आणि नफा मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी सुरुवातीचा काळ खूप चांगला असेल, वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. तुमच्या मेहनतीचं कौतुक होईल आणि कदाचित सन्मान सुद्धा केला जाईल. पण तुमच्या कामात खोडा घालणाऱ्या लोकांपासून सावध राहा. उच्च शिक्षण घेणाऱ्या आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आठवड्याच्या शेवटी चांगली बातमी मिळेल. व्यवसायाच्या दृष्टीने उत्तरार्ध लय शुभ असेल. बिझनेससाठी केलेला प्रवास यशस्वी होईल आणि एखादी मोठी डील फायनल होईल. जमीन, घर किंवा वाहन घेण्याचे योग आहेत. जर घरच्यांशी काही पटत नसेल, तर या आठवड्यात एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या मदतीने गैरसमज दूर होतील. मनातलं प्रेम व्यक्त करायचं असेल तर हा काळ चांगला आहे. जुनं प्रेम अजून घट्ट होईल. नवरा-बायकोमध्ये वाद होतील, पण संसार सुखाचा असेल.लकी कलर: लाल, लकी नंबर: 9
advertisement
मीन राशीसाठी हा आठवडा संमिश्र असेल. नोकरी करणाऱ्यांना मध्यम फळं मिळतील, त्यामुळे ऑफिसमध्ये छोट्या गोष्टींचा बाऊ करण्यापेक्षा आपल्या कामावर लक्ष द्या. सहकाऱ्यांवर आंधळा विश्वास ठेवू नका, स्वतःचं काम स्वतः करणं कधीही चांगलं. या काळात तुमची बदली एखाद्या नको असलेल्या ठिकाणी होऊ शकते किंवा जास्तीची जबाबदारी अंगावर येईल. बिझनेस करणाऱ्यांसाठी आठवड्याचा दुसरा भाग पहिल्या भागापेक्षा जास्त चांगला असेल. मार्केटमधल्या तेजीचा तुम्हाला फायदा घेता येईल. जर तुम्ही आधी कुठे गुंतवणूक केली असेल, तर त्याचा फायदा आता मिळेल. रखडलेले प्रोजेक्ट पूर्ण होतील आणि पैशांच्या समस्या सुटतील. उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळतील आणि बचत वाढेल. नात्यांच्या बाबतीत हा आठवडा शुभ असेल, घरगुती चिंता दूर होतील. जोडीदाराशी असलेले संबंध सुधारतील आणि वैवाहिक जीवन सुखी राहील.लकी कलर: आकाशी, लकी नंबर: 2







