advertisement

IND vs NZ : 'आम्ही 120 च्या स्ट्राईक रेटनेच खेळणार...', फायनलपूर्वी असं का म्हणाला कॅप्टन सूर्या? पत्रकार परिषदेत सर्वांना दिला धक्का!

Last Updated:

Suryakumar Yadav On strike rate Against Spinners : टीम इंडियाची ऑफ स्पिनविरुद्धची कामगिरी सध्या चिंतेचा विषय ठरत आहे. त्यावर सूर्याला पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला गेला.

Suryakumar Yadav Press Conference
Suryakumar Yadav Press Conference
Suryakumar Yadav Press Conference : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रोमांतक फायनल सामना खेळवला जाणार आहे. अशातच मॅचच्या 24 तासआधी दोन्ही संघाचे कॅप्टन पत्रकारांच्या प्रश्नाला सामोरे गेले. भारतीय टीम आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या फायनलमध्ये पोहोचली असली, तरी टीम इंडियाची ऑफ स्पिनविरुद्धची कामगिरी सध्या चिंतेचा विषय ठरत आहे. त्यावर सूर्याला पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला गेला.

स्ट्राईक रेट केवळ 120 चा...

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय बॅटर्सनी ऑफ स्पिनरसमोर तब्बल 15 विकेट्स गमावल्या असून, त्यांचा स्ट्राईक रेट देखील केवळ 120 राहिला आहे. रविवारी होणाऱ्या फायनलमध्ये न्यूझीलंडकडे 4 ऑफ स्पिनर्सचा पर्याय उपलब्ध असल्याने, पत्रकारांनी कॅप्टन सूर्यकुमार यादवला यावर प्रश्न विचारला.

आम्ही फायनलपर्यंत पोहोचू शकलो असू तर....

advertisement
पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सूर्याने अत्यंत आत्मविश्वासपूर्ण आणि सडेतोड भूमिका मांडली. सूर्याने स्पष्ट केलं की, टीममध्ये या विषयावर कोणतीही विशेष चर्चा झालेली नाही. "बघा आम्ही जर 120 च्या स्ट्राईक रेटने खेळून आम्ही फायनलपर्यंत पोहोचू शकलो असू, तर मला त्याच स्ट्राईक रेटने खेळायला आवडेल. आम्हाला यात कोणतीही अडचण वाटत नाही," असं सूर्यकुमारने यावेळी नमूद केलं.
advertisement

मिडल ऑर्डर स्पिनर्ससमोर फिक्की

न्यूझीलंडच्या ताफ्यात मिचेल सँटनर, रचिन रविंद्र, मार्क चॅपमॅन, इश सोडी आणि ग्लेन फिलिप्स यांच्यासह इतर ऑफ स्पिनर्सचा समावेश आहे, जे भारतीय बॅटर्सना अडचणीत आणू शकतात. विशेषतः पॉवरप्लेमध्ये अभिषेक शर्माला फिरकी गोलंदाजीसमोर संघर्ष करावा लागला आहे. तसेच मिडल ऑर्डर देखील स्पिनर्ससमोर लंगडताना दिसते. त्यामुळे टीम इंडियाला मोठा फटका बसलेला दिसतो.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs NZ : 'आम्ही 120 च्या स्ट्राईक रेटनेच खेळणार...', फायनलपूर्वी असं का म्हणाला कॅप्टन सूर्या? पत्रकार परिषदेत सर्वांना दिला धक्का!
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement