पुण्यातील सर्वात मोठ्या वाहतूक कोंडीचा 'द एंड'! विद्यापीठ चौकातील दुमजली पूल सुरू, मुख्यमंत्र्यांकडून लोकार्पण
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पुणेकरांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील बहुप्रतीक्षित 'एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे' लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले.
पुणे : पुणेकरांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील बहुप्रतीक्षित 'एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे' लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. आदूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) मुख्यमंत्र्यांनी या पुलाचा लोकांसाठी अधिकृत शुभारंभ केला. यामुळे पुणेकरांची वाहतूक कोंडीतून कायमची सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
वाहतुकीचा ताण होणार हलका
विद्यापीठ चौक हा पुण्यातील सर्वाधिक रहदारीचा भाग मानला जातो. येथे होणारी कोंडी लक्षात घेता, मेट्रो मार्गिका आणि उड्डाणपूल अशा एकत्रित रचनेचा हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. यामुळे बाणेर, पाषाण आणि विद्यापीठ रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांचा सिग्नलवरील ताण कमी होऊन प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या वाचणार आहे. हा दुमजली पूल आता पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
advertisement
हा पूल केवळ एक रस्ता नसून, पुण्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या प्रकल्पामुळे या परिसरातील वाहतूक गतिमान होणार असून, पुणेकरांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. आता हा दुमजली पूल पुणेकरांच्या सेवेत दाखल झाल्याने या चौकातील वाहतुकीचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार आहे.
advertisement
पुण्यातील सर्वाधिक वर्दळीच्या चौकांपैकी एक असलेल्या विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे. मेट्रो मार्गिका आणि उड्डाणपूल अशा एकत्रित रचनेमुळे सिग्नलवरील ताण कमी होऊन वाहनचालकांचा प्रवास अधिक जलद आणि सुलभ होणार आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 08, 2026 11:30 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यातील सर्वात मोठ्या वाहतूक कोंडीचा 'द एंड'! विद्यापीठ चौकातील दुमजली पूल सुरू, मुख्यमंत्र्यांकडून लोकार्पण









