advertisement

Kitchen Tips : फ्रिजमध्ये अजिबात ठेऊ नका 'ही' फळं; फ्रेश राहण्याऐवजी अजून लवकर होतील खराब!

Last Updated:
Do not keep these fruits in fridge : आपल्या घरातील फ्रिज आपल्यासाठी खूप महत्त्वाची वस्तू आहे. त्यामध्ये आपण हवं ते ठेवतो. फळं, भाज्या, अन्नपदार्थ.. फ्रिज मुळातच यासाठी असते की ते अन्नपदार्थ फ्रेश आणि चांगले ठेवते, खराब होऊ देत नाही. पण तुम्हाला माहितीये काही अशी फळं आहेत जी फ्रिजमध्ये ठवल्याने लवकर खराब होऊ शकतात.
1/7
तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण खरंच. काही फळं फ्रिजमध्ये ठेऊ नये. कारण ती त्यामध्ये लवकर खराब होऊ शकतात. ही फळं रूम टेम्परेचरवरच जास्त काळ टिकतात आणि फ्रेश राहतात. चला पाहुयात ती फळं कोणती आहेत.

2/7
अननस : न कापलेले अख्खे अननस फ्रिजमध्ये ठेऊ नये. ते रूम टेम्परेचरवर चांगले राहाते. मात्र तुम्ही अननस कापले असेल तर ते फ्रिजमध्ये ठेवावे लागते. अन्यथा ते खरा होण्याची शकता असते.

3/7
आंबा : आता आंब्याचे सीजन सुरु होईल. बरेच लोक एकाचवेळी खूप आंबे आणतात. त्यातले काही पिकलेले नसतात. हेही आंबे खराब होऊ नये म्हणून फ्रिजमध्ये ठेवतात. पण असं करू नये. कच्चा आंबा कधीही फ्रिजमध्ये ठेऊ नये. आंबा पिकल्यानंतर तुम्ही फ्रिजमध्ये ठेवू शकता.

4/7
कलिंगड आणि खरबूज : उन्हाळ्याची चाहूल लागताच घरात कलिंगड आणि खरबूज जवळपास रोज येतात. अख्खे कलिंगड तुम्ही फ्रिजमध्ये ठेऊ शकता. मात्र चिरलेले कलिंगड आणि खरबूज फ्रिजमध्ये ठेवू नये. कारण त्यामुळे यातील पाणी सुकू शकतात.

5/7
लीची : लीची फ्रिजमध्ये ठेवल्याने लवकर खराब होऊ शकते. खरं तर लिची रूम टेम्परेचरवरच चांगली आणि फ्रेश राहाते. त्यामुळे ती नेहमी फ्रिजबाहेरच ठेवावी.

6/7
केळी : केळी नेहमी घरात फ्रिजबाहेरच ठेवावी. कारण ती फ्रिजमध्ये ठेवल्यास तिची साल लवकर काळी पडू शकते. रूम टेम्परेचरवर केळी जास्त काळ फ्रेश राहतात आणि काळी पडत नाही.

7/7
पपई : पपई शक्यतो फ्रिजबाहेरच ठेवावी. मात्र पपई जास्त पिकलेली असेल तर ती काही काळ फ्रिजमध्ये ठेवली जाऊ शकते. तसेच उन्हाळ्यातही फ्रिजबाहेर जास्त काळ ठेऊ नये. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)

पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement