advertisement

वडील कुठं गेले म्हणून फोन केला, तर आंब्याच्या झाडाजवळून आवाज आला, ते दृश्य पाहून मुलाचा आक्रोश

Last Updated:

Solapur News: वडील घरात नसल्याने मुलगा अनिल याने त्यांच्या मोबाईलवर फोन केला असता आंब्याच्या झाडाजवळून रिंग वाजत असल्याचे त्याच्या लक्षात आले.

Solapur News: वडील कुठं गेले म्हणून फोन केला, तर आंब्याच्या झाडाजवळून आवाज आला, ते दृश्य पाहून मुलाचा आक्रोश
Solapur News: वडील कुठं गेले म्हणून फोन केला, तर आंब्याच्या झाडाजवळून आवाज आला, ते दृश्य पाहून मुलाचा आक्रोश
सोलापूर: शेतीसाठी भावकी किंवा भावा-भावातील वाद तसे नवे नाहीत. परंतु, सोलापुरात याच वादावरून दुर्दैवी घटना घडली आहे. सांगोला तालुक्यातील चिकमहूद बंडगरवाडी नं.1 येथे शेतजमिनीच्या वहिवाटीच्या वादातून एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. अर्जुन रामा बंडगर असे 65 वर्षीय मृताचे नाव आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शंभूराजे साळुंखे यांनी पोलिसांना खबर दिली. त्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. मृत अर्जुन बंडगर आणि त्यांचे भाऊ विठ्ठल बंडगर यांच्यात शेतजमिनीचे रीतसर वाटप होऊन त्याची दप्तरी नोंद देखील झाली होती. मात्र, पुतण्या सचिन बंडगर हा काही व्यवहार अपूर्ण असल्याचे कारण देत अर्जुन बंडगर यांना जमिनीवर वहिवाट घालू देत नव्हता. त्यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होत होता. हा वाद दिवसेंदिवस तीव्र होत गेला असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
या मानसिक त्रासाला कंटाळून अर्जुन बंडगर यांनी आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी आपल्या मृत्यूपूर्वी भाऊ विठ्ठल बंडगर आणि पुतण्या सचिन बंडगर यांच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवली होती. शुक्रवारी सकाळी सहा वाजण्यापूर्वी त्यांनी घरापासून सुमारे 600 फूट अंतरावर असलेल्या आंब्याच्या झाडाच्या फांदीला दोरीने गळफास घेतला.
advertisement
वडिलांना फोन केला अन्...
वडील घरात नसल्याने मुलगा अनिल याने त्यांच्या मोबाईलवर फोन केला असता आंब्याच्या झाडाजवळून रिंग वाजत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर तो आईसह घटनास्थळी धावून गेला. तेथे अर्जुन बंडगर यांनी गळफास घेतल्याचे पाहून कुटुंबीयांनी आक्रोश केला. मुलगा अनिल याने वडिलांना खाली उतरवून तातडीने सांगोला ग्रामीण रुग्णालयात नेले. परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच अर्जुन रामा बंडगर यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेमुळे बंडगरवाडीत हळहळ व्यक्त होत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
वडील कुठं गेले म्हणून फोन केला, तर आंब्याच्या झाडाजवळून आवाज आला, ते दृश्य पाहून मुलाचा आक्रोश
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement