Chandra Gochar: सोमवारी होणारे चंद्रगोचर अशुभ! 3 राशींच्या करिअर आणि आर्थिक गोष्टींमध्ये खळबळ उडणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology Marathi: ज्योतिषशास्त्रात चंद्राला मनाचा कारक आणि शुभ ग्रह मानलं जातं. पण जेव्हा चंद्र आपल्या नीच राशीत म्हणजे वृश्चिक राशीत प्रवेश करतो, तेव्हा तो काहीसा कमकुवत होतो. याचा थेट परिणाम माणसाच्या मानसिक स्थितीवर आणि निर्णयांवर होतो. 9 मार्च 2026 रोजी सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी चंद्र तूळ राशीतून बाहेर पडून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. या गोचरमुळे खालील 3 राशींच्या आयुष्यात मोठे चढ-उतार येऊ शकतात.
मेष - मेष राशीच्या लोकांसाठी चंद्राचं हे गोचर 8 व्या स्थानात होणार आहे. ज्योतिषशास्त्रात हे स्थान गुप्त संकटे आणि अनिश्चिततेचं मानलं जातं. या काळात तुमची अगदी शेवटच्या टप्प्यात आलेली कामं अचानक अडकू शकतात किंवा बिघडू शकतात. मानसिक अस्वस्थता वाढल्यामुळे कामात लक्ष लागणार नाही. कोणाशीही व्यवहार करताना किंवा नवीन मैत्री करताना विचार करा, कारण चुकीच्या लोकांच्या संगतीमुळे तुमचं आर्थिक नुकसान आणि वेळेचा अपव्यय होऊ शकतो.
advertisement
advertisement
मिथुन - मिथुन राशीच्या लोकांसाठी चंद्र तुमच्या 6 व्या स्थानात प्रवेश करणार आहे. हे स्थान रोग, ऋण आणि शत्रूंचे मानले जाते. या काळात तुमचे गुप्त शत्रू किंवा विरोधक तुमच्या विरुद्ध कारस्थानं करू शकतात. ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी विनाकारण मतभेद किंवा नोकझोक होण्याची शक्यता आहे. तुमची इमेज टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाशी नम्रतेने आणि संयमाने वागा.

धनु - आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पुरेशी झोप घ्या आणि कामाचा ताण कमी करण्यासाठी योग-ध्यानाची मदत घ्या. नात्यांमध्ये सुद्धा दुरावा येण्याची शक्यता आहे; विशेषतः ज्यांच्यावर तुम्ही खूप विश्वास ठेवता, अशा व्यक्तीकडून फसवणूक होऊ शकते. त्यामुळे कोणताही मोठा निर्णय घेताना दुसऱ्यावर विसंबून न राहता स्वतः खात्री करून घ्या. शिवलिंगावर दररोज स्वच्छ पाणी आणि बेलपत्र अर्पण करा, यामुळे संकटांची तीव्रता कमी होईल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)