advertisement

प्रेमासाठी धर्म बदलला, 10 वर्षात 4 लेकरं झाली, नवऱ्याने.., पुण्याच्या 'मिस इंडिया अर्थ' सायलीसोबत घडला भयंकर प्रकार

Last Updated:

पुण्याच्या सायलीने धर्म बदलून लग्न केलं होतं. मात्र मागील दहा वर्षांपासून नवऱ्यासह सासरच्या मंडळींकडून तिचा सातत्याने छळ केला जात होता. आता ती पुन्हा हिंदू धर्मात परत आली आहे.

News18
News18
गोविंद वाकडे, प्रतिनिधी पिंपरी चिंचवड: पुणे जिल्ह्याच्या पिंपरी चिंचवडमधील एका तरुणीसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. या तरुणीने दहा वर्षांपूर्वी एका वेगळ्या धर्मात प्रेमविवाह केला होता. प्रेमासाठी तिने धर्मही बदलला होता. मात्र मागील दहा वर्षांपासून नवऱ्यासह सासरच्या मंडळींकडून तिचा सातत्याने छळ केला जात होता. आता अखेर तिने काही हिंदू संघटनांच्या मदतीने यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आता तिचं शुद्धीकरण करून तिला हिंदू धर्मात प्रवेश दिला आहे.
सायली सूर्वे असं या तरुणीचं नाव आहे. तिने २०१६ मध्ये घरच्यांचा विरोध झुगारून ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर शहरातील प्रसिद्ध उद्योगपती आतिफ तासे याच्यासोबत विवाह केला होता. लग्नानंतर तिने धर्म परिवर्तन केलं होतं. तिचं सायली नाव बदलून अलिझा नाव ठेवण्यात आलं होतं. तिने प्रेम विवाह केला असला तरी लग्नानंतर नवऱ्यासह तिच्या सासरच्या लोकांनी तिचा छळ केल्याचा आरोप सायलीनं केलं आहे.
advertisement
या प्रकरणी तिने काही वेळा पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांकडून तिची दखल घेतली गेली नाही. अलीकडेच ती काही हिंदू संघटनांच्या संपर्कात आली. यानंतर तिची सुखरूप सुटका करण्यात आली. तिचं शुद्धीकरण करून तिला पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश दिला आहे. तिचं नवं नाव अद्या सुर्वे ठेवण्यात आलं आहे.

विरोध झुगारून प्रेम विवाह केला

advertisement
पिंपरी चिंचवड मधील रहिवासी असलेल्या सायलीनं या सगळ्या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिने सांगितलं की, "2016 मध्ये मीरा भाईंदर शहरातील प्रसिद्ध उद्योजक आतिफ तासे सोबत घरच्यांचा विरोध झुगारून लग्न केलं होतं. मात्र आतिफशी लग्न करणं, आपली मोठी चूक होती, लग्न झाल्यानंतर सतत आपला छळ केला गेला आणि आपलं धर्मांतरण देखील केल्या गेल्याचा आरोप सायलीने केलाय. मागच्या दहा वर्षाच्या काळात आपल्याला चार मुलं झाली. त्यांच्या सुरक्षेसाठी आपण लग्नातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं तिने सांगितलं.
advertisement

शुद्धीकरण करून हिंदू धर्मात प्रवेश

या बाबत अनेकवेळा आपण पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचं देखील सायली म्हणाली. अनेक प्रयत्न केल्यानंतर आपण हिदुत्वादी संघटनांच्या संपर्कात आलो. आता त्यांच्या मार्फतच आपल्याला हिंदुधर्मात प्रवेश दिल्या गेल्याचं सायलीनं सांगितलं. सायलीला परत हिंदू धर्मात घेण्यासाठी होम हवन मंत्रोच्चार करण्याची प्रक्रिया राबवली गेली. धक्कादायक बाब म्हणजे ही प्रक्रिया बघण्यासाठी रविवारी सुट्टीच्या दिवशी महापालिकेतील लहान विद्यार्थिनींना बोलवण्यात आलं होतं.
advertisement
हिंदू धर्मात प्रवेश देण्यासाठी हवन करताना सायली सुर्वे आणि हिंदू संघटनांचे पदाधिकारी
हिंदू धर्मात प्रवेश देण्यासाठी हवन करताना सायली सुर्वे आणि हिंदू संघटनांचे पदाधिकारी
शुद्धीकरण प्रकियेशिवाय हिंदू धर्मात प्रवेश मिळाला नसता का? या अडचणीच्या प्रश्नांवर सायलीच्या वकिलानं आक्षेप नोंदवत बोलण्यास टाळाटाळ केली. तेव्हा समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र सायली सुर्वेच्या धर्मांतराची आता पुण्यात विविध चर्चा सुरू झाली आहे. या संपूर्ण प्रकरणावर अद्याप सायलीचा पती अथवा सासरच्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
प्रेमासाठी धर्म बदलला, 10 वर्षात 4 लेकरं झाली, नवऱ्याने.., पुण्याच्या 'मिस इंडिया अर्थ' सायलीसोबत घडला भयंकर प्रकार
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement