advertisement

आयटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता ऑफिसला सुसाट जायचं, हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोबाबत मोठी अपडेट समोर

Last Updated:
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोबाबत मोठी अपडेट समोर (फाईल फोटो)
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोबाबत मोठी अपडेट समोर (फाईल फोटो)
पुणे : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आयटी हब असलेल्या हिंजवडीला थेट शहराशी जोडणारी 'हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो' (लाईन ३) आता पूर्णत्वास येत आहे. या २३ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे तब्बल ९४ टक्के काम पूर्ण झाले आहे. यावरील १३ स्थानके प्रवासासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहेत, अशी माहिती पीएमआरडीए च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
मेट्रो धावण्यास सज्ज
पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडच्या सहकार्याने पीएमआरडीए हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवत आहे. या मार्गावरील २३ स्थानकांपैकी १५ ते १७ स्थानकांचे ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून, १३ स्थानके पूर्णपणे तयार झाली आहेत. संपूर्ण मार्गावर सध्या मेट्रोच्या चाचणी फेऱ्या (Trial Runs) वेगाने सुरू आहेत.
एप्रिलमध्ये सेवेचा मुहूर्त?
मेट्रोचे कामकाज एप्रिल २०२६ च्या डेडलाईननुसार पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. मात्र, अधिकृत सेवा सुरू करण्यापूर्वी कन्सेशनरकडून अंतिम मंजुरी पत्र मिळणे बाकी आहे. हे पत्र मिळाल्यावरच पूर्ण मार्ग सुरू करायचा की काही स्थानकांपुरती अंशत: सेवा सुरू करायची, याचा निर्णय घेतला जाणार आहे. हिंजवडीतील आयटी प्रोफेशनल्स आणि शिवाजीनगर परिसरातील हजारो चाकरमान्यांसाठी ही मेट्रो वरदान ठरणार आहे.
advertisement
ही मेट्रो शिवाजीनगर येथे पुणे मेट्रोच्या विद्यमान नेटवर्कला जोडली जाणार आहे, ज्यामुळे प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे अधिक सोयीचे होईल. तांत्रिक आणि सुरक्षाविषयक सर्व बाबींची पडताळणी झाल्यानंतर लवकरच पुणेकरांच्या सेवेत ही 'लाईफलाईन' दाखल होईल, अशी चिन्हे आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
आयटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता ऑफिसला सुसाट जायचं, हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोबाबत मोठी अपडेट समोर
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement