Ajit Pawar Plane Crash: ''९९ टक्के जनतेच्या मनात शंका, अजितदादांच्या अपघाताची चौकशी...'', रोहित पवारांना मिळाली महायुतीच्या माजी नेत्याची साथ
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Ajit Pawar Plane Crash Probe: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर अनेकांच्या मनात अजूनही शंका आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अपघात चौकशीवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
मधुकर गलांडे, इंदापूर, पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर अनेकांच्या मनात अजूनही शंका आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अपघात चौकशीवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीला मागणी येत असताना दुसरीकडे कधीकाळी महायुतीमध्ये राहिलेल्या पक्षानेदेखील आक्रमक भूमिका मांडली आहे. सरकारच्या चौकशीवर लोकांना विश्वास राहिला नसल्याचा हल्लाबोल राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी केला आहे.
पुण्यातील इंदापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अजितदादांच्या विमान अपघाताच्या चौकशीची मागणी केली. त्यांनी म्हटले की, "उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताबाबत महाराष्ट्रातील ९९ टक्के जनतेच्या मनात संशयाची पाल चुकचुकत आहे. हा अपघात होता की घातपात? याचे सत्य जनतेसमोर येणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या अहवालावर विसंबून न राहता, केंद्र सरकारने सीबीआय आणि सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करावी," अशी आक्रमक मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) नेते आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी केली आहे. इंदापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना जानकर यांनी या प्रकरणावरून राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला.
advertisement
महादेव जानकर म्हणाले की, "अजित दादांसारख्या मोठ्या नेत्याचा अपघात होतो, तेव्हा जनमानसात विविध शंका उपस्थित होणे स्वाभाविक आहे. सध्या जो सरकारी अहवाल समोर येत आहे, त्यावर जनता विश्वास ठेवायला तयार नाही. जर सरकारला आपली प्रतिमा स्वच्छ ठेवायची असेल, तर त्यांनी या प्रकरणाचे 'दूध आणि पाणी' वेगळे करून सत्य जनतेसमोर आणले पाहिजे."
advertisement
सीबीआय चौकशीची गरज
यावेळी जानकर यांनी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली सीबीआय चौकशीची मागणी लावून धरली. "केवळ पोलीस तपासावर जनता समाधानी नाही. यामागे कोणते मोठे कारस्थान आहे का, हे शोधण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली निष्पक्ष तपास व्हायला हवा. जे सत्य आहे ते बाहेर यावे, हीच राष्ट्रीय समाज पक्षाची अधिकृत भूमिका आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 08, 2026 12:34 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar Plane Crash: ''९९ टक्के जनतेच्या मनात शंका, अजितदादांच्या अपघाताची चौकशी...'', रोहित पवारांना मिळाली महायुतीच्या माजी नेत्याची साथ










