advertisement

Water News : मुंबईत 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार; कुठे कमी दाबाने तर कुठे पूर्णपणे बंद? जाणून घ्या

Last Updated:
Mumbai Water Cut News : मुंबईतील काही भागात येत्या काही दिवसांत पाणीपुरवठा बंद असणार आहे तर काही भागात कमी दाबाने येणार आहे. नक्की कोणत्या भागातील नागरिकांना ही समस्या जाणवणार आहे ते जाणून घ्या.
1/7
गोरेगाव शहरात राहणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. शहरात येत्या काही दिवसांत पाणीपुरवठ्या संबंधित समस्या जाणवणार आहे.

2/7
बीएमसी कडून गोरेगाव (पूर्व) येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीमार्गावरील उड्डाणपुलाच्या पोहोच रस्त्यावर महत्त्वाचे जलवाहिनी दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे.

3/7
हे काम मंगळवार 10 मार्च 2026 रोजी सकाळी 9 वाजता सुरू होऊन बुधवार 11 मार्च 2026 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत चालणार आहे. या 24 तासांच्या कालावधीत 'पी पूर्व' आणि 'पी दक्षिण' विभागातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे, तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणी मिळणार आहे.

4/7
शिवशाही प्रकल्प परिसरात नियमितपणे रात्री 11.45 ते पहाटे 5.45 या वेळेत होणारा पाणीपुरवठा या कालावधीत बंद राहील. तसेच श्रीकृष्ण नगर आणि इंदिरा गांधी संशोधन संस्था परिसरात मध्यरात्री 3.30 ते सकाळी 9 या वेळेत होणारा पाणीपुरवठाही बंद असेल.

5/7
याशिवाय सॅटेलाईट टॉवर, संतोष नगर, माळी नगर, हबळे पाडा, उमरशेट पाडा, नगरमोडे पाडा, सुनील मैदान आणि फिल्म सिटी मार्गालगतचा परिसर येथेही रात्री 12 ते पहाटे 3 या वेळेत होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

6/7
दरम्यान मोहन गोखले मार्ग, कृष्णा वाटिका मार्ग, साई मार्ग आणि आर्य भास्कर मार्ग या परिसरात पाणी कमी दाबाने मिळणार आहे.

7/7
पालिका प्रशासनाने नागरिकांना पाणीपुरवठा बंद होण्यापूर्वी आवश्यक तेवढे पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर काही दिवस गढूळ पाणी येण्याची शक्यता असल्याने पाणी गाळून आणि उकळून वापरण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement