advertisement

ना धडकला ना पडला, दुचाकी चालवताना तरुणाचा अचानक मृत्यू, जालन्याच्या गणेशसोबत काय घडलं?

Last Updated:

Jalna News: जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातून एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. इथं दुचाकीवरून जाणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू झाला आहे.

News18
News18
Jalna News: जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातून एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. इथं दुचाकीवरून जाणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू झाला आहे. हा तरुण रस्त्याने जात असताना रस्ता मोकळा होता. तो कशालाही धडकला नाही किंवा खालीही पडला नाही. वेगही मर्यादीत होता, तरीही तरुणाला मृत्यूनं गाठलं. भररस्त्यात त्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. शनिवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गणेश केशव गावंडे असं मृत पावलेल्या २५ वर्षीय तरुणाचं नाव आहे. हा तरुण शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास आनवा येथून भोकरदन शहराकडे काही कामानिमित्त आपल्या दुचाकीवरून निघाला होता. प्रवासादरम्यान अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. काही कळायच्या आतच त्याला हृदयविकाराचा झटका आला. हा झटका इतका तीव्र होता की, गणेशचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि तो रस्त्यावरच कोसळला.
advertisement

स्थानिकांची धाव, पण वेळ निघून गेली होती

हा अपघात पाहून रस्त्यावरील इतर प्रवाशांनी आणि स्थानिक नागरिकांनी तातडीनं गणेशच्या दिशेनं धाव घेतली. त्याला मदत करण्यासाठी नागरिकांनी तत्परता दाखवत जवळच्या रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था केली. मात्र, दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच गणेशची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. प्राथमिक अंदाजानुसार, मृत्यूचे कारण हृदयविकाराचा तीव्र झटका असल्याचे सांगितले जात आहे.
advertisement

कुटुंबावर दुःखाचा डोंगर

गणेशच्या मृत्यूची बातमी समजताच आनवा गावावर शोककळा पसरली आहे. अवघ्या २५ वर्षांच्या तरुणाचा अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठवून दिला. या घटनेचा पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ना धडकला ना पडला, दुचाकी चालवताना तरुणाचा अचानक मृत्यू, जालन्याच्या गणेशसोबत काय घडलं?
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement