advertisement

Iran Attack US Fleet: दुखरी नस दाबताच इराण खवळला, कल्पनाही केली नसेल असा अमेरिकेला शिकवला धडा, २१ सैनिकही ठार

Last Updated:

Iran Attack US Fleet: आठव्या दिवशी हे युद्ध आणखी तीव्र झालं आहे. इस्रायल-अमेरिकेने इराणच्या तेलसाठ्यावर हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर आता इराणने आता पलटवार करण्यास सुरुवात केली आहे.

दुखरी नस दाबताच खवळला इराण, कल्पनाही केली नसेल असा अमेरिकेला शिकवला धडा, २१ सैनिकही ठार
दुखरी नस दाबताच खवळला इराण, कल्पनाही केली नसेल असा अमेरिकेला शिकवला धडा, २१ सैनिकही ठार
तेहरान: इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. इस्रायल आणि अमेरिकेने इराण विरोधात युद्ध पुकारल्यानंतर आठव्या दिवशी हे युद्ध आणखी तीव्र झालं आहे. इस्रायल-अमेरिकेने इराणच्या तेलसाठ्यावर हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर आता इराणने आता पलटवार करण्यास सुरुवात केली आहे. इराणने अमेरिकेने कल्पनाही केला नसेल एवढा मोठा प्रहार केला आहे. इराणने अमेरिकेच्या पाचव्या आरमारावर हल्ला केला आहे.
इराणी सशस्त्र दलांनी बहरीनमध्ये तैनात असलेल्या अमेरिकेच्या शक्तिशाली 'पाचव्या नौदलाच्या' (US Fifth Fleet) ताफ्यावर मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. या हल्ल्यात अमेरिकेचे २१ सैनिक ठार झाले असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत, असा खळबळजनक दावा इराणने केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण आखाती देशांमध्ये युद्धाचा धोका टोकाला पोहचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
advertisement
इराणी माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, बहरीनची राजधानी मनामा येथील 'जुफेर' परिसरात असलेल्या अमेरिकेच्या नौदलाच्या मुख्यालयाला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यानंतर तळावर मोठ्या प्रमाणावर आग लागल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. अमेरिकेची मध्य पूर्वेतील सर्वात महत्त्वाची लष्करी ताकद असलेल्या या तळावर अनेक लष्करी सुविधांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, अमेरिकेकडून अद्याप या जीवितहानीबाबत अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
advertisement
advertisement

काय आहे अमेरिकेचे 'पाचवे नौदल' (Fifth Fleet)?

पर्शियन आखात, लाल समुद्र आणि अरबी समुद्रासह सुमारे २५ लाख चौरस मैल समुद्री क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी या ताफ्यावर आहे.
जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग असलेल्या 'होर्मुझची सामुद्रधुनी' आणि आंतरराष्ट्रीय व्यापारी जहाजांचे संरक्षण करणे हे या नौदलाचे प्राथमिक कार्य आहे.
advertisement
या ताफ्यात साधारणपणे ८,००० हून अधिक कर्मचारी, विमानवाहू युद्धनौका, अत्याधुनिक पाणबुड्या आणि ड्रोन यंत्रणांचा समावेश असतो.
हा ताफा ४० हून अधिक देशांच्या संयुक्त सागरी दलांसोबत काम करून दहशतवाद आणि चाचेगिरी रोखण्याचे काम करतो.

जागतिक बाजारपेठेत चिंतेचे ढग

जगातील तेलाचा मोठा पुरवठा ज्या मार्गावरून होतो, तिथेच थेट हल्ला झाल्याने जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील हा थेट संघर्ष आता महायुद्धाच्या दिशेने सरकतोय का, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
Iran Attack US Fleet: दुखरी नस दाबताच इराण खवळला, कल्पनाही केली नसेल असा अमेरिकेला शिकवला धडा, २१ सैनिकही ठार
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement