शिक्षण फक्त दहावी, गावात राहून इंजिनिअरपेक्षा जास्त कमाई, सोलापूरच्या शेतकऱ्यानं काय केलं? Video
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Business Success: बाळासाहेबांनी नोकरीच्या मागे न धावता दुग्ध व्यवसायात नशीब आजमावले आणि यातून ते महिन्याला एक लाख रुपयांचा निव्वळ नफा कमवत आहेत.
सोलापूर: शिक्षण कमी असले तरी कष्टाची तयारी आणि नियोजनाची जोड असेल तर माणूस शून्यातून विश्व निर्माण करू शकतो. सोलापूर जिल्ह्यातील पेनूरच्या बाळासाहेब महादेव रणदिवे यांनी हेच सिद्ध करून दाखवले आहे. केवळ दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या बाळासाहेबांनी नोकरीच्या मागे न धावता दुग्ध व्यवसायात नशीब आजमावले आणि आज ते या व्यवसायातून महिन्याला एक लाख रुपयांचा निव्वळ नफा कमवत आहेत. लोकल18 च्या माध्यमातून हाच प्रवास जाणून घेऊ.
दहावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भविष्यातील अनिश्चितता पाहून बाळासाहेबांनी स्वतःचा मार्ग निवडण्याचे ठरवले. सुमारे 15 वर्षांपूर्वी त्यांनी केवळ दोन गायींपासून आपल्या व्यवसायाचा श्रीगणेशा केला. सुरुवातीच्या काळात अनेक अडचणी आल्या, मात्र त्यांनी हार मानली नाही. सातत्यपूर्ण मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर आज त्यांच्या गोठ्यात तब्बल 40 गाई आहे.
advertisement
गायींपासून दररोज सकाळ आणि संध्याकाळ मिळून सुमारे 200 लिटर दुधाचे उत्पादन होते. तीन महिन्यांनी पशुवैद्यकांना गोठ्यावर बोलावून गायींची तपासणी केली जाते. तसेच आवश्यक लसीकरणही केले जाते. गायींना दिवसातून दोन वेळा चारा आणि योग्य खुराक दिला जातो. गोठ्याची नियमित स्वच्छता आणि जनावरांची विशेष काळजी घेतली जाते.
या व्यवसायासाठी दरमहा चारा आणि खुराकावर सुमारे एक लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र दूध विक्रीतून होणाऱ्या उत्पन्नातून सर्व खर्च वजा करून त्यांना महिन्याला सुमारे एक लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतो, असे बाळासाहेब सांगतात.
advertisement
देशात वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा व्यवसाय उभा करावा, असे आवाहन रणदिवे करतात. शेती असेल तर शेती करावी, अन्यथा छोट्या प्रमाणात व्यवसाय सुरू करून मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येते, असा प्रेरणादायी संदेश ते तरुणांना देत आहेत.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Mar 10, 2026 2:00 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
शिक्षण फक्त दहावी, गावात राहून इंजिनिअरपेक्षा जास्त कमाई, सोलापूरच्या शेतकऱ्यानं काय केलं? Video






