इराण-इस्रायल युद्धाची झळ थेट महाराष्ट्राला, कुठे-किती गॅस सिलिंडरचा तुटवडा?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
इस्रायल-इराण युद्धामुळे महाराष्ट्रात गॅस तुटवडा जाणवतोय. लोकांना गॅससाठी रांगा लावाव्या लागत आहेत. सरकारने घरगुती गॅसला प्राधान्य दिलं असलं तरीसुद्धा भरउन्हात रांगा लावून गॅस घेण्यासाठी थांबले आहेत.
इस्रायल-इराण युद्धाची झळ नाही म्हणता म्हणता आता महाराष्ट्राला बसायला लागली आहे. या युद्धामुळे महाराष्ट्रात आता गॅसचा तुटवडा जाणवू लागला आहे. सरकारने सर्वसामान्य लोकांचं नुकसान होऊ नये यासाठी घरगुती गॅस सिलिंडरला प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर घरगुती गॅस सिलिंडरसाठी 25 दिवस वाट पाहावी लागणार आहे. ज्यांचा आधीच गॅस संपला आहे अशा लोकांना मात्र आता अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पाय पोळत आहेत, डोक्यावर रणरणतं ऊन या सगळ्या परिस्थितीमध्ये रांगेत उभं राहून गॅसची वाट पाहात आहेत. गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. यासाठी लोकांना मोठी कसरत करावी लागत आहे. राज्यात कुठे-कुठे गॅस सिलिंडरचा तुडवडा आहे आणि कुठे काय परिस्थिती आहे ती जाणून घेऊया,
पंढरपुरात गॅस खरेदीसाठी लांबच लांब रांगा
घरगुती गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी सध्या पंढरपूरमध्ये नागरिकांना कसरत करावी लागत आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे घरपोच गॅस सेवा मिळत नाही. अशातच नागरिकांनी रांगा लावून गॅस खरेदी करण्याकडे गर्दी केलेली दिसून येत आहे. प्रशासनाकडून गॅसचा काळाबाजार होऊ नये यासाठी भरारी पथके नेमण्यात आली आहेत. अशा परिस्थितीतही घरात चूल बंद होऊ नये. घरातील गॅस चालू राहावा. त्यासाठी रांगा लावून लोक गॅस खरेदी करत आहेत.
advertisement
धाराशिवमध्ये गॅसचा मोठा तुटवडा
धाराशिव इराण अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस तुटवडा रोखण्यासाठी भारत सरकारने घरगुती गॅस 60 रुपयांने महाग केला तर त्यात गॅस बुक केल्यानंतर 25 दिवस पूर्ण झाल्यानंतर च गॅस मिळणार आहे सरकारने या जारी केल्याला या नवीन निर्बंधा वर सामान्य गहिणींनी तीव्र संताप व्यक्त केला असून आता उन्हाळा सुरू आहे सुट्टी चे दिवस असल्याने गॅस वापर जास्त होणार आहे त्यात पहिल्या सारखी चूल पेटवण्यासाठी लाकडं देखील उपलब्ध होत नसल्याने सरकारने निर्बंध कमी करावे अशी मागणी महिलांनी केली आहे.
advertisement
पुण्यात जेवण चुलीवर शिजवण्याची वेळ
गॕस नसल्याने चुलीवर जेवण शिजवण्याची वेळ पुण्यातील व्यवसायिकांवर आली आहे. युद्धामुळे हॉटेल व्यवसायिकांवर ही वेळ आली. कमर्शियल गॅसचा पुरवठा पुण्यात बंद असल्याने हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले आहेत.
पुण्यातील अनेक हॉटेल बंद करण्याची नामुष्की हॉटेल मालकांवर ओढवली. गुढी पाडवा जवळ आहे, गुढी पाडवा या सणानिमित्त अनेक जण मोठ्या प्रमाणात मिठाईच्या ऑर्डर या स्वीट होम्स आणि मिठाईच्या कारखान्याला दिल्या जातात मात्र आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे यंदा गॅसच्या तुटवड्यामुळे मिठाई तयार करणारे कारखाने बंद पडू लागलेत. जिथे दहा गॅस सिलिंडरची गरज आहे तिथे तीनच सिलिंडर मिळत आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅसवरुन राडा
गॅस टंचाईमुळे सर्वसामान्यांना एक सिलिंडर तरी मिळावं यासाठी रांगेत उभे राहावं लागतंय. नागरिकांना आपल्या नोकऱ्या सोडून रांगेत उभे रहावे लागत आहे तर घरात गॅस नसल्यामुळे महिलांना जेवण बाहेरून बोलवावे लागत आहे.
संभाजीनगर जिल्ह्यातील एमआयडीसी वाळूज परिसरातील लोक सध्या त्रस्त झाले आहेत. गॅस टंचाईमुळे सर्वसामान्यांना एक सिलिंडर तरी मिळावं यासाठी रांगेत उभे राहावं लागतंय. नागरिकांना आपल्या नोकऱ्या सोडून रांगेत उभे रहावे लागत आहे तर घरात गॅस नसल्यामुळे महिलांना जेवण बाहेरून बोलवावे लागत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एमआयडीसी वाळूज परिसरातील लोक सध्या त्रस्त झाले आहेत. भर उन्हात रांगा लावून उभे आहेत.
advertisement
अमरावतीमध्ये गॅसचा मोठा तुटवडा
इजराइल इराण युद्धाचा फटका आता भारतातील नागरिकांनाही बसताना दिसत आहे. अमरावती शहरात गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे शहरात गॅस एजन्सींना कमी प्रमाणात सिलिंडर पुरवठा होत असल्याने ग्राहकांना वेळेवर सिलिंडर घरी पोहोचत नसल्याने ग्राहक थेट आता गॅस एजन्सी समोरच सिलिंडर घेऊन मागणी करत आहे.सिलिंडर साठी ग्राहकाने मोठ्या प्रमाणात रांग लावल्याचे चित्र सध्या अमरावती शहरात आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने ग्राहकांची मात्र तारांबळ उडत आहे सोबतच गॅस एजन्सी धारकांनाही ग्राहकांच्या रोशाचा सामना करावा लागत आहे.
advertisement
कोल्हापुरात गॅसच्या रांगेवरुन राडा
कोल्हापूरातही सकाळपासून गॅससाठी लोकांनी रांग लावली आहे. गॅस वेळेत मिळत नसल्याने तिथल्या लोकांसोबत हुज्जत घातली आणि बाचाबाची सुरू केली. राजारामपुरीतील गॅस एजन्सीसमोर सिलिंडरसाठी नागरिकांनी पहाटेपासून गर्दी केली होती. तासनतास रांगेत उभे राहूनही गॅस मिळत नसल्याने नागरिक संतापले होते.
गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने ग्राहक आणि कर्मचारी यांच्यात मोठी वादावादी झाली. "आम्ही घरची कामे सोडून इथे रांगेत उभे आहोत, पण गॅस कधी मिळणार याची शाश्वती कोणीच देत नाही," अशा संतप्त प्रतिक्रिया गृहिणींनी व्यक्त केल्या. अनेक ठिकाणी वादाचे रूपांतर शाब्दिक चकमकीत झाले असून, परिस्थिती हाताळताना कर्मचाऱ्यांची मोठी ओढाताण झाली.
advertisement
ठाण्यातही गॅस सिलिंडरचा तुटवडा
ठाणे महानगरपालिका हद्दीतील कळवा परिसरात गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवू लागला असून यामागे आखाती राष्ट्रांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम असल्याची माहिती समोर येत आहे. कळवा शहरात सुमारे ४५ हजार घरांमध्ये एचपी गॅसचा पुरवठा केला जातो. मात्र सध्या मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कळवा शहरात दररोज सुमारे दीड हजार ते दोन हजार एचपी गॅस सिलिंडरची मागणी असते. मात्र सध्या केवळ सुमारे ९०० सिलेंडरच उपलब्ध होत असल्याने उर्वरित ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
परिणामी अनेक नागरिक थेट गोडाऊनमध्ये जाऊन चौकशी करत असून काही ठिकाणी संतप्त ग्राहकांकडून वादविवादाचे प्रकारही घडत आहेत. गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने सिलिंडर उपलब्धतेत घट झाली आहे. त्यामुळे परिस्थिती सुरळीत होईपर्यंत नागरिकांनी संयम बाळगण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 10, 2026 2:02 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
इराण-इस्रायल युद्धाची झळ थेट महाराष्ट्राला, कुठे-किती गॅस सिलिंडरचा तुटवडा?







