advertisement

Bigg Boss Marathi 6 : आता तिला घरीच पाठवते आईकडे ! अनुश्रीचा राग अनावर, घेतलं चॅलेंज; या स्पर्धकाला काढणार घराबाहेर?

Last Updated:

घरात आईच्या पत्रावरून घरात मोठा राडा होणार आहे. अनुश्रीचा राग इतका अनावर झाला की तिनं घरातील एका स्पर्धकाला थेट घरी पाठवण्याचं चॅलेंजच घेतलं. 

News18
News18
Bigg Boss Marathi 6  च्या घरात दर आठवड्याला नॉमिनेशन टास्क होतो. पण या आठवड्याच्या टास्कमध्ये स्पर्धकांमध्ये तणावाचं वातावरण आहे. जवळच्या व्यक्तींकडून आलेली पत्र स्पर्धकांचा गेम फिरवणार आहेत.  यावेळीही नॉमिनेशन टास्कमध्ये भावनांचा मोठा उद्रेक पाहायला मिळणार आहे. घरात आईच्या पत्रावरून घरात मोठा राडा होणार आहे. अनुश्रीचा राग इतका अनावर झाला की तिनं घरातील एका स्पर्धकाला थेट घरी पाठवण्याचं चॅलेंजच घेतलं.
या टास्कमध्ये स्पर्धकांसाठी त्यांच्या कुटुंबाकडून आलेली पत्रं देण्यात येतात. मात्र ती मिळवण्यासाठी घरातील सदस्यांना काही कठीण निर्णय घ्यावे लागतात. यावेळी अनुश्री आणि संस्कृती या दोघींना त्यांच्या आईकडून पत्र आलं होतं. पण अनुश्रीला आईचं पत्र मिळालं नाही असं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
advertisement
पत्र न मिळाल्यामुळे अनुश्री खूपच इमोशनल होते. ती संस्कृतीला विनंती करत म्हणते, "प्लीज, प्लीज दे मला." मात्र संस्कृती तिची विनंती नाकारते. त्यानंतर अनुश्रीचा संताप अनावर होतो. ती रडू लागते आणि अक्षरशः आकांत तांडव करताना दिसते. रागाच्या भरात ती हट्ट धरते आणि जमिनीवर हात-पाय आपटत आईचं पत्र पाहिजे असल्याचं सांगते. हे सगळं पाहून घरातील सदस्य देखील रडू लागतात.
advertisement
भावनांच्या भरात अनुश्री म्हणते, "मी नाही… आता नाही राहू शकत इथे यार." तिची ही अवस्था पाहून घरातील वातावरणही तणावपूर्ण झालेलं दिसतं. दुसरीकडे संस्कृती तिची बाजू मांडताना म्हणते, "मला एक चान्स पाहिजे." दोघींमधील तणाव अधिकच वाढत जातो.
advertisement
यानंतर अनुश्री प्राजक्ताशी बोलताना राग व्यक्त करते. ती म्हणते, "मी आता तिलाच नॉमिनेट करणार. मी तिला आईच दाखवते आता. तिला घरीच पाठवणार आता आईकडे." अनुश्रीच्या या वक्तव्यामुळे पुढच्या नॉमिनेशनमध्ये संस्कृतीला लक्ष्य केलं जाणार असं दिसतंय. संस्कृतीचा घराबाहेर काढण्याचं चॅलेंज अनुश्रीनं घेतलं आहे.
प्रोमोच्या शेवटी घरातील हा वाद पाहत राखी सोफ्यावर बसून "आता वॉर सुरू." असं म्हणते. तिच्या या वक्तव्यामुळे पुढील भागांमध्ये अनुश्री आणि संस्कृती यांच्यातील संघर्ष आणखी वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : आता तिला घरीच पाठवते आईकडे ! अनुश्रीचा राग अनावर, घेतलं चॅलेंज; या स्पर्धकाला काढणार घराबाहेर?
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement