advertisement

Summer Laddu Recipe : उन्हाळ्यासाठी बेस्ट, रोज 1 लाडू खा, डोकेदुखी-केसगळतीपासून थकवाही होईल कमी! पाहा रेसिपी

Last Updated:

Healthy summer special mung daal laddu recipe : उन्हाळ्यात डोकेदुखी, केस गळती, हाडांचे दुखणे, थकवा हे काही सामान्य त्रास सर्वांना जाणवतात. पण तुम्हाला एका लाडवाने कोणत्याही त्रासाशिवाय पोषण मिळाले तर? यासाठी आज आम्ही तुम्हाला एक लाडूची रेसिपी सांगत आहोत.

पौष्टिक उन्हाळ्याचे लाडू बनवण्याची सोपी पद्धत..
पौष्टिक उन्हाळ्याचे लाडू बनवण्याची सोपी पद्धत..
मुंबई : उन्हाळा आला की, आपल्याला उष्ण पदार्थ खाणं टाळावं लागतं. यामुळे लाडू किंवा सुकामेवा तर प्रमाणातच खावा लागतो. पण मग शरीराला पुरेसं पोषण मिळत नाही. उन्हाळयात पाणी पिणे आणि थंड पदार्थ खाण्याव्यतिरिक्त काहीही जास्त खायची इच्छा होत नाही. अशावेळी शरीराला पोषण न मिळाल्याने अनेक समस्या सुरु होतात.
उन्हाळ्यात डोकेदुखी, केस गळती, हाडांचे दुखणे, थकवा हे काही सामान्य त्रास सर्वांना जाणवतात. पण तुम्हाला एका लाडवाने कोणत्याही त्रासाशिवाय पोषण मिळाले तर? यासाठी आज आम्ही तुम्हाला एका भन्नाट लाडूची रेसिपी सांगत आहोत. जो लाडू तुमच्या या सर्व समस्यांवर रामबाण उपाय आहे. ही रेसिपी foodtubers_laxmi या अकाऊंटवर शेअर केली गेली आहे. चला पाहूया, पौष्टिक उन्हाळ्याचे लाडू कसे बनवायचे.
advertisement
पौष्टिक उन्हाळ्याचे लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य..
- 1 वाटी मुगाची डाळ
- अर्धी वाटी पिठीसाखर
- 1 चमचा वेलची पावडर
- 2 चमचे भोपळ्याच्या बिया
- 3 चमचे साजूक तूप
पौष्टिक उन्हाळ्याचे लाडू बनवण्याची सोपी पद्धत..
- सर्वात आधी मुगाची डाळ घ्या आणि ती 4 ते 5 वेळा पाण्याने स्वच्छ धुवा.
advertisement
- त्यानंतर गॅसवर एक पॅन किंवा कढई ठेवा या आणि गरम करा.
- आता या कढईमधे डाळ टाकून ती ओलावा जाईपर्यंत भाजून घ्या.
- आता ही डाळ गॅसवरून उतरवून बाजूला ठेवा आणि थंड होऊ द्या.
- डाळ थंड झाल्यावर ती मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्या.
- यानंतर ती डाळ चालून घ्या जेणेकरून त्यात मोठे कण राहणार नाहीत.
advertisement
- आता एक नॉनस्टिक पॅन घ्या आणि त्यामध्ये एक चमचा तूप टाका.
- तूप गरम झाल्यावर त्यामध्ये डाळीचे पीठ टाका आणि ते भाजा.
- त्यानंतर परत एक चमचा तूप टाकून पीठ एकसारखं भाजून घ्या.
- आता पॅनमध्ये पीठ बाजूला करून एक चमचा तूप टाका आणि त्यामध्ये कलिंगडाच्या बिया टाकून भाजा.
advertisement
- आता हे मिश्रण पॅनमधून ताटामध्ये काढा.
- गरम असतानाच या मिश्रणामध्ये पिठी साखर आणि वेलची पूड घालून एकत्र करा.
- या लाडवांच्या मिश्रणात तुम्ही सुका मेवादेखील घालू शकता.
- यानंतर या मिश्रणाचे लाडू बांधा.
advertisement
हे लाडू झटपट तयार होतात मुलांनादेखील खायला खूप आवडतात. तसेच हे लाडू पचायला हलके असल्यामुळे तुम्ही ते उन्हाळयात खाऊ शकता. उन्हाळयाच्या समस्यांपासून वाचायचं असेल तर एकदा हे लाडू बनवून नक्की खाऊन बघा.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Summer Laddu Recipe : उन्हाळ्यासाठी बेस्ट, रोज 1 लाडू खा, डोकेदुखी-केसगळतीपासून थकवाही होईल कमी! पाहा रेसिपी
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement