सीताफळ उत्पादक शेतकरी विठ्ठल सिसोदे हे गेल्या तीन वर्षांपासून सीताफळाचे उत्पन्न मिळवत आहेत, तिसऱ्या वर्षी सरासरी 125 कॅरेट सीताफळ निघाले, चौथ्या वर्षी त्याच एक एकर शेतात 250 कॅरेट सीताफळ निघाले. यंदाचे पाचवे वर्ष आहे आता 300 कॅरेट सीताफळ निघतील असा अंदाज त्यांचा आहे.
Success Story: बँकेतील नोकरीचा दिला राजीनामा, प्रणिता यांनी सुरू केला ब्रँड, महिन्याला 15 लाख कमाई
advertisement
सीताफळामध्ये नफा भरपूर आहे फक्त योग्य भाव मिळाला पाहिजे, भाव स्थिर नसल्यामुळे उत्पन्न कमी - जास्त होते. सीताफळ जास्त पिकल्यास ते खराब होण्यास सुरुवात होते सध्या पावसाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे सीताफळाची काढणी वेगाने सुरू आहे. सीताफळाची शेती करण्यासाठी विशेष अशी काळजी घेणे गरजेची नाही पण शेणखत वापरणे, झाडांची परिस्थिती पाहून फवारणी करणे हे महत्त्वाचे ठरते. ज्या शेतकऱ्यांकडे जास्त शेती आहे त्यांच्या सीताफळाची शेती फायद्याची आहे त्यामुळे त्यांनी ही शेती करण्यास हरकत नाही, असे देखील सिसोदे यांनी म्हटले आहे.





