एकच प्याला..! महिलांनी दारू पिणं चांगलं की वाईट? पुरुषाच्या तुलनेत शरिरावर कसा होतो परिणाम?
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
आजकाल महिलांमध्ये दारू पिण्याचं प्रमाण वाढताना दिसतंय. कधी पार्टी, कधी स्ट्रेस, तर कधी सोशल ड्रिंक म्हणून दारू स्वीकारली जाते.
छत्रपती संभाजीनगर : आजकाल महिलांमध्ये दारू पिण्याचं प्रमाण वाढताना दिसतंय. कधी पार्टी, कधी स्ट्रेस, तर कधी सोशल ड्रिंक म्हणून दारू स्वीकारली जाते. पण प्रश्न असा आहे की महिलांनी दारू पिणं खरंच सुरक्षित आहे का? पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या शरिरावर दारूचा परिणाम वेगळा होतो का? याबद्दलचं स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर पूजा कोहकडे सपकाळ यांनी माहिती दिली आहे.
शरिरातील पाण्याचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेने कमी असते त्यामुळे मद्यपानाचे दुष्परिणाम महिलांमध्ये जास्त आणि लवकर होतात. कितीही लिमिटमध्ये जरी सेवन केलं तरी त्याच्यापासून होणारे नुकसान नाहीसे करता येत नाहीत. ते फक्त कमी करता येतात. स्त्रियांमध्ये त्यामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. पाच ते पंधरा टक्क्यांनी वाढतो. मद्यपान केल्यामुळे लिव्हर डॅमेज होण्याची शक्यता असते.
advertisement
हे जास्त घातक ठरते. टीन एजर्स मधल्या मुलींमध्ये हिप्पो कॅम्पस नावाच्या मेंदूच्या भागाला नुकसान होते त्याचे डेव्हलपमेंट डिस्टर्ब होते. त्यामुळे मेमरी परफॉर्मन्स बिघडतो आणि शालेय जीवनाचे नुकसान होते. प्रेग्नेंसी दरम्यान किंवा प्रेग्नेंसी अगोदर अल्कोहोल घेतल्यास बाळाच्या विकासाला नुकसान होते ज्याला फिटल अल्कोहोल सिंड्रोम असे म्हणतात. प्रक्रिया करू शकत नाही त्यामुळे बाळाची फिजिकल, कॉग्निटिव्ह आणि बिहेवियर म्हणजेच विकासात्मक, मानसिक, शारीरिक आणि वर्तनाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते.
advertisement
मद्यपानामुळे वंध्यत्व येते. मद्यपानामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होते. त्यामुळे मासिक पाळी अनियमित होते. बीज अंडे फुटण्यातही अडथळा निर्माण होतो, गर्भधारणा रुजण्यात अडथळा होतो. मिसकॅरेजचा धोका होतो. वाढत्या मद्यपानामुळे वजन वाढते यामुळे पीसीओडी, पीसीओएस सारखे आजार होतात, पोटाचा घेर देखील वाढतो. अशा अनेक समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागते. यामुळे मानसिक ताण वाढतो, डिप्रेशनमध्ये जाऊ शकता अशा अनेक समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागते, असं डॉक्टर पूजा कोहकडे सपकाळ सांगतात.
advertisement
view commentsLocation :
Aurangabad Cantonment,Aurangabad,Maharashtra
First Published :
Dec 30, 2025 9:51 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
एकच प्याला..! महिलांनी दारू पिणं चांगलं की वाईट? पुरुषाच्या तुलनेत शरिरावर कसा होतो परिणाम?










