advertisement

Happy New Year च्या गिफ्टचा मेसेज आला का? क्लिक करू नका, अकाउंट होईल खाली, हे लक्षात ठेवा! Video

Last Updated:

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. परंतु, हे नवीन वर्ष साजरे करताना काही महत्त्वाच्यागोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहे.

+
News18

News18

जालना : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. परंतु, हे नवीन वर्ष साजरे करताना काही महत्त्वाच्यागोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहे. 31 डिसेंबरच्या रात्री किंवा 1 जानेवारीच्या सकाळी आपल्याला सायबर गुन्हेगारांची टोळी फसवू शकते. ही फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या ट्रीक वापर हे सायबर भामटे करू शकतात. याबाबत जालना स्थानिक गुन्हे शाखेने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबरच्या मध्यरात्री किंवा 1 जानेवारी रोजीच्या सकाळी आपल्या मोबाईलवर एखादा लाॅटरी लगल्याचा किंवा नवीन वर्षाचे गिफ्ट असल्याचा मेसेज येवू शकतो. सोबतच एखादी एपीके फाईल देखील असेल.अशा प्रकारची फाईल किंवा लिंक अजिबात ओपन करू नका.
advertisement
तुमची एक चूक अन् तुमच्या बॅंक खात्यात असलेले सगळे पैसे गायब होऊ शकतात. यामुळे नागरिकांना असा प्रकारच्या फसव्या आमिषांना बळी पडू नये. अशा प्रकारे आलेल्या मेसेज किंवा एपीके फाईल ला कोणत्याही प्रकारे प्रतिसाद देऊ नका. कोणत्याही प्रकारची मदत अथवा तक्रार करावयाची असल्यास सायबर हेल्पलाईन 1930 वर काॅल करावा, असं आवाहन स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार संजय सोनवणे यांनी केलं आहे.
advertisement
दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या फसव्या कॉल मेसेज पासून वाचावे. आमिषांना बळी पडू नये. फेक कॉल मेसेज ला रिप्लाय करू नये. ज्यामुळे त्यांचेच आर्थिक नुकसान आणि मानसिक खच्चीकरण होणार नाही. यासाठी नागरिकांनी स्वतः खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे देखील पोलिसांनी आपल्या व्हिडीओ संदेशात सांगितले आहे.
view comments
मराठी बातम्या/जालना/
Happy New Year च्या गिफ्टचा मेसेज आला का? क्लिक करू नका, अकाउंट होईल खाली, हे लक्षात ठेवा! Video
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement