अमेठी (उत्तर प्रदेश ): गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा हे घोषवाक्य आजही गावा-गावात भिंंतींंवर दिसतं. हिवताप किंवा मलेरिया ज्या डासांपासून होतो त्या डासांची पैदास गप्पी माशांमुळे आटोक्यात राहतो. गप्पीसारखाच आणखी एक मासा डेंग्यू-मलेरियाच्या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी अत्यंत उपयुक्त समजला येतो. या माशाला Gabusia Fish म्हणतात.
उत्तर प्रदेश सरकार तिथल्या शेतकऱ्यांना गंबुशिया मासा पाळण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय विभाग मत्स्यपालकांसाठी विविध योजना राबवत आहे. मत्स्य व्यवसाय विभागातर्फे विशेष उपक्रम राबविला जात आहे. या विशेष उपक्रमात रोजगाराबरोबरच शेतकऱ्यांचा नफाही होणार आहे. गंबुसिया मासे डासांच्या अळ्या (larvae) खातात. त्यामुळे डासांंची पैदास रोखली जाते.
advertisement
त्यासाठी जिल्ह्यातील तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात मासे सोडण्यात येणार आहेत. त्याचबरोबर हे मासे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे ही साधन ठरणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील मत्स्य व्यवसाय विभागाकडून विशेष प्रकारच्या माशांची ऑर्डर देण्यात येत असून या माशांमुळे शेतकऱ्यांना एकाच वेळी अनेक फायदे होणार आहेत.
'गॅंबुसिया जाती'च्या माशांबद्दल मत्स्य व्यवसाय विभागाकडून शेतकऱ्यांना जागरुक करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मत्स्यशेती करणारे सर्व शेतकरी त्यांच्या तलावात हे मासे सोडणार आहे.
गंबुसिया जातीचे मासे पाळून रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत. तसेच शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू शकणार आहे. उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यात 1 लाखांहून अधिक मासे येथे आणले जाणार असून, ते 500 हून अधिक तलावांमध्ये सोडण्यात येणार आहेत.
वरिष्ठ मत्स्य व्यवसाय निरीक्षक अनिल कुमार म्हणाले की, मत्स्य व्यवसाय विभागाकडून वेळोवेळी शेतकऱ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. सध्या अनेक शेतकरी मत्स्यशेती करून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. अशा तऱ्हेने आता गांबुसिया मासे शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरणार असून डासांच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनावरही फायदेशीर काम असणार आहे. हा एक चांगला उपक्रम आहे.
