घरी रंग तयार करण्यासाठी तुम्ही पालक, त्यासोबत बीट रूट, हळद, कॉर्नफ्लॉवर, वाळलेले सूर्यफूल, संत्र्याची साल, डाळिंबाची साल, जास्वंदाचे फुल, त्यासोबत पावसाची वाळलेली पानं यांपासून देखील उत्तम रंग तयार करू शकतो. जर तुम्हाला ओला रंग तयार करायचा असेल तर यासाठी तुम्ही संत्री असतात त्याची जी वाळलेली साल आहे ती थोडं कोमट पाणी घ्यायची. त्यामध्ये रात्रभर भिजत ठेवायची आणि सकाळी त्याचा एकदम छान असा ऑरेंज रंग तयार होतो. आता सोबत तुम्ही वाळलेली गोकर्णची फुलं आहेत त्यापासून देखील असा ओला रंग तयार करू शकता. त्यासोबत तुम्ही आपलं जे जास्वंदाचे फुल आहे त्याच्यापासून देखील अशाच पद्धतीने रंग तयार करू शकता.
advertisement
जर तुम्हाला कोरडे रंग तयार करायचे असतील तर यासाठी तुम्ही जे बाजारात कॉर्नफ्लॉवर विकत मिळतात त्याचा वापर करू शकता. त्या कॉर्नफ्लॉवरमध्ये तुम्ही हळद टाकून थोडं पाणी टाकायचं, मिक्स करायचं, जास्त पातळ नाही एकदम घट्ट पण नाही मिडीयम ठेवायचं. ते कसं ताटात राहता वर ठेवायचं आणि त्यानंतर ते सुकल्यानंतर त्याची बारीक पावडर करायची आणि तुमचा रंग बनवून तयार होतो. त्यासोबतच तुम्ही आपले जे खाण्याचे रंग असतात ते रंग कॉर्नफ्लॉवरमध्ये टाकायचे, सेम प्रोसेस करायची आणि तुमचे सगळे रंग भरून तयार होतात.
अशा पद्धतीने तुम्ही घरी होममेड रंग तयार करू शकता यामध्ये कुठले केमिकल नाहीत. एकदम पर्यावरण पूरक असे रंग आहेत. तुम्ही लहान मुलांना देखील बिनधास्त हे रंग लावू शकता. तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा.





