तुमच्या बाळाची काळजी घ्या! छ. संभाजीनगरात 15 महिन्यांच्या चिमुकल्यानं खडा गिळला अन्...
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Chhatrapati Sambhajiangar: परिस्थिती गंभीर होताच कुटुंबीयांनी तत्काळ त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे दाखल केले.
छत्रपती संभाजीनगर : पैठण गेट परिसरात खेळत असताना सुमारे 15 महिन्यांच्या एका चिमुकल्याने नकळत खडा गिळल्याची गंभीर घटना घडली. गिळलेला खडा श्वासनलिकेत अडकून पुढे फुप्फुसाच्या डाव्या बाजूला पोहोचल्याने बालकाला श्वास घेण्यास तीव्र अडचण निर्माण झाली. परिस्थिती गंभीर होताच कुटुंबीयांनी तत्काळ त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे दाखल केले.
तपासणीनंतर कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ. सुनील देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय पथकाने तातडीने ‘ब्रॉन्कोस्कोपी’ प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. भूल देऊन दुर्बिणीच्या सहाय्याने श्वासनलिकेत ‘फोरसेप’ (चिमटा) टाकत अडकलेला खडा अत्यंत कौशल्याने बाहेर काढण्यात आला. ही प्रक्रिया यशस्वी ठरल्यानंतर बालकाची ऑक्सिजन पातळी स्थिर झाली असून प्रकृतीत सुधारणा झाली आहे.
advertisement
या उपचार मोहिमेत डॉ. अदीब हुसेन, डॉ. गिरिजा जालनापूरकर तसेच भूलतज्ज्ञ डॉ. गणेश निकम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, लहान मुलांच्या सवयींकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. दात येण्याच्या काळात मुले हाताशी लागेल ती वस्तू तोंडात घालतात. त्यामुळे खेळण्यांचे सुटे भाग, सीताफळ, शेंगदाणे, खारीक यांसारख्या वस्तू देताना त्या नीट बारीक करूनच द्याव्यात, असे डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Feb 28, 2026 10:05 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
तुमच्या बाळाची काळजी घ्या! छ. संभाजीनगरात 15 महिन्यांच्या चिमुकल्यानं खडा गिळला अन्...







