advertisement

Bigg Boss Marathi 6 : कानाला प्रचंड त्रास! 'या' सदस्याच्या आवाजाला सगळे वैतागले; रितेशने 'भाऊचा धक्का'वर बोलतीच बंद केली

Last Updated:

Bigg Boss Marathi 6 Bhaucha Dahakka : बिग बॉस मराठी 6 च्या भाऊच्या धक्क्याचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात रितेश आवाजावरून एका सदस्याची शाळा घेताना दिसतो आहे.

News18
News18
बिग बॉस म्हटलं की घरात वाद, भांडणं आलीच. पण बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमधील काही सदस्यांचा आवाज इतका मोठा आहे की त्याचा कानाला त्रास होतो आहे. अगदी रितेश देशमुखनेही एका सदस्याच्या आवाजावर आक्षेप घेतला आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेशने या सदस्याच्या आवाजावरून त्याला चांगलंच झापलं आहे.
बिग बॉस मराठी 6 च्या भाऊच्या धक्क्याचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात रितेश आवाजावरून एका सदस्याची शाळा घेताना दिसतो आहे. रितेश म्हणतो आरडाओरडा, आवाज आणि प्रेक्षकांच्या कानाला प्रचंड त्रास' आता घरातील हा सदस्य नेमका कोण आहे? तर ती आहे तन्वी कोलते. तन्वीला रितेशने आवाजावरून सुनावण्याची ही पहिलीच वेळ नाही. तर याआधीही भाऊच्या धक्क्यावर रितेश तन्वी कोलते किती बोलते, असं म्हटलं होतं.
advertisement
आताच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश फक्त तन्वीला बोलल्याचं दिसतं. पण याआधी त्याने रुचितालाही सुनावलं होतं. रुचिता बोलायला लागली की प्रेक्षक आवाज म्युट करतात, असं तो म्हणाला होता.
advertisement
बिग बॉसमधील सदस्याच्या आवाजावरून सलमान खानचा फोन
दरम्यान बिग बॉसच्या घरातील मोठ्या आवाजाचा मुद्दा पहिल्यांदाच नाही.  यापूर्वीही बिग बॉसच्या घरात एका स्पर्धकाचा आवाज एवढा गाजला होता की थेट सलमान खानने तेव्हाचे होस्ट महेश मांजरेकर यांना फोन केला होता. ती स्पर्धक म्हणजेच तृप्ती देसाई. त्या बिग बॉस मराठी 3 मध्ये सहभागी झाल्या होत्या. तृप्ती देसाईंनी स्वत:च सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत हा किस्सा सांगितला होता. त्यांनी लिहिलं की, "बिगबॉसच्या घरातील माझा जोरात आवाज ऐकून सलमान खान यांचा फोन महेश मांजरेकर सरांना आला होता."
advertisement
तृप्ती यांनी बिग बॉसच्या चावडीचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. महेश मांजरेकर म्हणाले होते, "सलमानचा फोन आला मला. त्यांच्या सेटवरचे सगळे कॉन्टेस्टंट सकाळी कोणाला चहा द्यायचा आहे असं विचारत होते. कोणाचे पाय चेपायचे आहेत कोणाचं काय करायचं आहे. सलमान म्हणाला, हे लोक पागल झालेत का? त्याने सांगितलं की, आदेश येतायत एका बाईचे, मोठ मोठ्याने. चहा कुठेय माझा, हे कुठेय माझं... तृप्ती तुमचा आवाज ऐकून तिकडच्या सेटवरचे काम करत होते. कारण इथे बाजूलाच आहे ना तो सेट.
advertisement
तृप्ती देसाई म्हणाल्या, "हो सर गेला असेल. मला हुकूमशाहची पदवी मिळाल्यामुळे माझा आवाज मला त्या पट्टीत ठेवता आला." मांजरेकर म्हणाले, "हुकूमशाह म्हणजे आरडा ओरडा नाही ना. तो हुकुम क्या शाह झाला." दरम्यान महेश मांजरेकर यांनी हा संपूर्ण सीन मिश्किलमध्ये सांगितला होता.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : कानाला प्रचंड त्रास! 'या' सदस्याच्या आवाजाला सगळे वैतागले; रितेशने 'भाऊचा धक्का'वर बोलतीच बंद केली
Next Article
advertisement
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार; मालकाचे खळबळजनक विधान, म्हणाला- हळूहळू काढण्यापेक्षा मी एकदाच...
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार
  • सर्वात भयानक काळ सुरू

  • 'क्रूर' निर्णयाने कर्मचारी सुन्न

  • 4,000 कुटुंबांची चूल विझली

View All
advertisement