advertisement

Success Story : घरातून सुरू केले मसाल्यांचे काम, अश्विनी यांचा ब्रँड ठरला हिट, महिन्याला अडीच लाखांची उलाढाल

Last Updated:

त्यांच्याकडे जवळपास दीडशे प्रकारचे वेगवेगळे मसाले तयार केले जातात. साधारणपणे या व्यवसायाच्या माध्यमातून अश्विनी डेहाळे यांची महिन्याला 2 ते अडीच लाखांची उलाढाल होते.

+
घरातून

घरातून सुरू केले मसाल्यांचे काम, आज 35 महिलांना रोजगार; अश्विनी डेहाळे यांचा व्य

छत्रपती संभाजीनगर : वैजापूर तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील अश्विनी डेहाळे या गेल्या पाच वर्षांपासून वाळूज एमआयडीसी परिसरात विविध प्रकारच्या मसाल्यांची निर्मिती करतात. खडे मसाले, चटणी, मिरची पावडर, काळा मसाला तयार करून या उत्पादनांची विक्री देखील करतात. त्यांच्याकडे जवळपास दीडशे प्रकारचे वेगवेगळे मसाले तयार केले जातात. साधारणपणे या व्यवसायाच्या माध्यमातून अश्विनी डेहाळे यांची महिन्याला 2 ते अडीच लाखांची उलाढाल होते. तसेच त्यांनी 30 ते 35 महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. नेमकी या मसाल्यांची निर्मिती कशा पद्धतीने केली जाते, इतर महिलांनी हा व्यवसाय कशा पद्धतीने करावा याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊ.
वाळूज एमआयडीसी येथे साधारणपणे 2020 मध्ये अश्वराज मसाले या उत्पादनाच्या निर्मितीला घरातूनच सुरुवात झाली. या ठिकाणी काळा मसाला, खानदेशी गरम मसाला अशा प्रकारचे दीडशे मसाले येथे बनवले जातात. या व्यवसायाची विशेष बाब म्हणजे अनेक महिलांच्या हाताला काम लागते, त्यांना रोजगार उपलब्ध होतो त्यामुळे समाधान वाटते.
advertisement
मसाल्यांमधील उत्पादनांची पॅकिंग पूर्णपणे स्वतः महिलांच्या साहाय्याने केली जाते. त्यासाठी काही उपकरणे आणि यंत्र देखील वापरले जातात. अश्वराज मसाल्यांची उत्पादने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह विविध ठिकाणी विक्री केली जातात. याबरोबरच ऑनलाइन तसेच विविध ठिकाणी लागणाऱ्या स्टॉलच्या माध्यमातून देखील विक्री सुरू असते. या व्यवसायाच्या माध्यमातून जवळपास अडीच लाखांची उलाढाल होते, असे व्यावसायिका अश्विनी डेहाळे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
advertisement
महिलांनी मसाले व्यवसायात यावे का? काय काळजी घ्यावी..
नक्कीच इतर महिलांनी देखील मसाले निर्मितीच्या व्यवसायामध्ये यायला पाहिजे. मसाले बनवताना मसाल्यांचा दर्जा उच्च ठेवावा, त्यामध्ये केमिकलचा वापर टाळावा, परिसरात स्वच्छता बाळगावी, यासह आणखी काही बाबींचा विचार करून हा व्यवसाय केल्यास नक्कीच यश मिळते त्यामुळे इतर महिलांनी या व्यवसायात आले तरी काही हरकत नाही, असे देखील डेहाळे यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Success Story : घरातून सुरू केले मसाल्यांचे काम, अश्विनी यांचा ब्रँड ठरला हिट, महिन्याला अडीच लाखांची उलाढाल
Next Article
advertisement
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार; मालकाचे खळबळजनक विधान, म्हणाला- हळूहळू काढण्यापेक्षा मी एकदाच...
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार
  • सर्वात भयानक काळ सुरू

  • 'क्रूर' निर्णयाने कर्मचारी सुन्न

  • 4,000 कुटुंबांची चूल विझली

View All
advertisement